Malegaon Crime : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला, मंगळसूत्र आणि मोबाईल हिसकावून चोरटे पसार

| Updated on: Aug 12, 2023 | 12:26 PM

महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला किंवा जेष्ठ नागरिकांना रस्त्यात एकटे गाठून त्यांच्यावर हल्ले करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढल्या आहेत.

Malegaon Crime : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला, मंगळसूत्र आणि मोबाईल हिसकावून चोरटे पसार
Follow us on

मालेगाव / 12 ऑगस्ट 2023 : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेवर जीवघेणा हल्ला करत तिला लुटल्याची घटना मालेगावमध्ये घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वर्षा जाधव असे जखमी महिलेचे नाव आहे. मालेगावच्या दाभाडी रोडवर ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी महिलेला जखमी करुन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. एकट्या महिलेला पाहून तिच्यावर हल्ला करुन लुटण्याच्या घटना सध्या वाढल्या आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेता प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मॉर्निंग वॉकला जाताना हल्ला करत लुटले

वर्षा जाधव ही महिला नेहमीप्रमाणे आज सकाळी माॉर्निंग वॉकला चालली होती. यावेळ दाभाडी रोडवर महिला एकटी असल्याची संधी साधत तीन जण तिचा पाठलाग करत तिच्याजवळ आले. आरोपींनी महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर आरोपी पसार झाले. जखमी महिलेला स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले.

पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरु

घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत महिलेचा जबाब घेतला. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे रस्त्यावरुन एकट्या चाललेल्या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

हे सुद्धा वाचा