नाशिक : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यात कॉलेजला देखील सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे तरुणाई दुपारच्या वेळेला रामकुंडावर पोहण्यासाठी येत असते. याच दरम्यान एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नुकतेच या तरुणाने बारावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर त्याला वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊन नोकरी करायची होती. मात्र त्याचे हे स्वप्न अर्धवट राहिले. मित्रांच्या संगतीने फिरत फिरत रामकुंडावर आला होता. मित्रांना पोहणे येत असल्याने आणि रामकुंडात पोहण्याचा अनुभव असल्याने त्यांनी उडी मारली आणि पोहू लागले. पण याच दरम्यान सहर्ष राजेंद्र भालेराव याने उडी मारली पण त्याच्यासोबत दुर्दैवी घटना घडली.
नाशिकच्या रामकुंडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. त्याच दरम्यान अनेक तरुण तेथे अंघोळीसाठी येतात. असेच सहर्ष आणि त्याचे मित्र फिरत फिरत रामकुंडावर आले होते. पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही.
गांधी तलावात सहर्ष आणि त्याचे मित्र अंघोळीसाठी उतरले होते. त्याच दरम्यान पाण्याचा प्रवाह हा अधिक असल्याचा त्यांना अंदाज न आल्याने दोघे जणं पाण्यात वाहू लागले होते. त्यातील एकाला वाचविण्यात आले. मात्र, नंतर सहर्ष याला बाहेर काढण्यात आले.
सहर्षला तात्काळ जिल्हा रुगालयात दाखल करण्यात आले. मात्र. डॉक्टरांनी तात्काळ तपासले मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. या घटनेने कॉलेजसह मित्रा परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. भालेराव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मृत्यू झालेल्या तरुण हा गंगापुर रोड येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होते. नुकतीच त्याने बारावीची परीक्षा दिली. तो विज्ञान शाखेच शिक्षण घेत होता. त्याले पुढे जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊन नोकरी करायची होती. मात्र त्याचे हे स्वप्न अपुरे राहिले.
पोहण्याचा छंद असणं काही वाईट नाही. मात्र, त्यापूर्वीच शिकत असतांना दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोहणे शिकणेच जिवावर बेतल्याचे समोर आल्याने मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे .