नाशिक : नाशिक शहराची लाईफलाइन असलेल्या सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामध्ये सिटीलिंकच्या बस कंडक्टर महिलेत आणि प्रवासी महिलेत हा तूफान राडा झाला आहे. सिडको परिसरात हा प्रकार घडला आहे. बुधवारी सिम्बॉयसिस कॉलेज येथून ही बस निमानी बस स्थानकात येत होती. त्यामध्ये एक महिला प्रवासी बसल्यानंतर तिच्याकडे सुट्टे पैसे देण्याची मागणी केल्यानंतर हा मारहाणीचा प्रकार घडला आहे. यामध्ये प्रवासी महिलेने बस कंडक्टर महिलेला मारहाण केली आहे. त्यामध्ये महिला जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या संपूर्ण प्रकारामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. याबाबत मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सिडको परिसरात नाशिक महानगर पालिकेच्या बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशी महिलेला तिकिटाचे सुट्टे पैसे द्या म्हटल्याने वाद होऊन प्रवाशी महिलेने महिला कंडक्टरला मारहाण केली.
या प्रकरणी महिला कंडक्टरच्या फिर्यादीवरून अनोळखी महिले विरुद्ध मारहाण संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिम्बॉयसिस ते निमानी एसटी सुनीता जाधव बसमध्ये कंडक्टर म्हणून ड्युटीवर होत्या.
बुधवारी ही बस सिम्बॉयसिस येथून निमानी येथे येत होती. सिम्बॉयसिस येथील बस स्टॉपवरून एक प्रवासी बसमध्ये बसली. बसही सिम्बॉयसिस येथून त्रिमूर्ती चौक येथे आल्यानंतर प्रवाशाला कंडक्टरने तिकीट काढण्याबाबत विचारणा केली.
त्यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर प्रवाशाने महिला कंडक्टरशी हुज्जत घालून शिवीगाळ करून मारहाण केली त्यांनांतर जखमी त्यामुळे सुनीता जाधव यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे अॅडमिट करण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहेत.