नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यातील लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे तीन महिण्यात 70 हून अधिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे 35 हून अधिक सापळे यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये 70 हून अधिक लाचखोर नाशिक एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. ही आकडेवारी मार्च अखेरीस समोर आल्याने लाचखोरीची चर्चा सुरू असतांनाच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. आश्रम शाळेचा अधिक्षकच एसीबीच्या जाळ्यात अडकला असून हरसुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरंबी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेला पाण्याच्या टँकर सुरू करण्यासाठी आवश्यक आदेश काढून देतो यासाठी विवेक मधुकर शिंदे यांनी 20 हजार रुपयांची मागणी केली होती. संबंधित व्यक्तीने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत खात्री करून घेत तक्रारदाराच्या माहितीवरून सापळा रचला होता. त्यामध्ये 20 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. हरसुल पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचखोर अधिकारी विवेक शिंदे याने तक्रारदार याला आदिवासी विकास भवन येथून लागणारा आदेश काढून देतो. त्याकरिता 20 हजार रुपयांची मागणी केली होती. फेब्रुवारी महिण्यात ही लाच मागीतल्यानंतर हा महिनाभराने लाच घेतांना अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, एसीबीचे नारायण न्याहाळदे, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. सापळा अधिकारी म्हणून अनिल बागूल यांनी ही कारवाई केली आहे.