नाशिक : आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. जवळपास परीक्षा होत आल्याअसून त्यानंतर लोक सुट्टी असल्याने बाहेर फिरायला जात आहे. त्यात आता लग्नसराई सुरू झाल्याने अनेक जण गावाला जात आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश घराला कुलूप लावल्याचे पाहून घरफोडी होण्याचे प्रमाण हळूहळू वाढण्याची स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात घरफोडीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांकडून याबाबत विशेष सुचना दिल्या जात आहे. मात्र, नागरिकांचे दुर्लक्ष होत असल्याने घरफोडी होण्याची शक्यता अधिक असते. नुकतीच नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
घर बंद दिसलं की चोरांनी घरफोडी केलीच म्हणून समजा अशी एक स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये जून सिडकोत घरफोडी करून इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
तक्रारदार विराज विश्वनाथ सूर्यवंशी यांनी तक्रार दिल्यानंतर अंबड पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. यामध्ये मार्च महिण्यात 22 ते 27 मार्च दरम्यान विराज हे बाहेर गावी गेले होते. चोरांनी हीच संधी शोधली आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
घराचा लॉक तोडून चोरांनी घरात प्रवेश केला होता. त्यामध्ये घरात इलेक्ट्रॉनिक साहित्य असल्याचे निदर्शनास आले. चोरांनी तेच चोरून नेले आहे. त्यामुळे भरदिवसा ही चोरी झाल्याचे बोलले जात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको परिसरातील ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही चोरी झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
घरफोडीच्या घटनांना वेळीच आळा घालावा यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिक शहरातील पोलिस घरफोडीचं सत्र रोखण्यासाठी काय करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.