नाशिक : नाशिक जिल्ह्यात तसा द्राक्ष घेऊन पसार होण्याचा किंवा शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा प्रकार नवीन नाहीत. अनेक व्यापाऱ्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व्यापऱ्यांनी चुना लावला आहे. काही शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, नुकताच दिल्ली येथील असल्याचे सांगून काही भामट्यांनी व्हेजिटेबल कंपनीला चुना लावला आहे. तब्बल 88 लाखांना भामट्यांनी गंडा घालत धूम ठोकली आहे. त्यात विशेष म्हणजे यामध्ये व्हेजिटेबल कंपनीचा मालक ज्या आमिषाला बळी पडला ती बाब समोर आल्यानं संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, दुसरीकडे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला असून विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खोरी फाट्याजवळ वक्रतुंड व्हेजिटेबल कंपनी आहे. विकास हिरामन घुगे असं त्या कंपनीच्या मालकाचे नाव आहे. या मालकाला दिल्लीतील दोन व्यापाऱ्यांनी गंडा घातला आहे.
द्राक्ष खरेदीचे कमिशन मिळेल असे आमिष दाखवून खरंतर या व्हेजिटेबल कंपनीची फसवणूक केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे. विशेष म्हणजे बाजारात द्राक्षाला भाव नाही तितके कमिशनच भामट्यांनी व्हेजिटेबल कंपनीला देण्याचे ठरविले होते.
त्यामुळे शेतकऱ्यांना किती पिसे देण्याचे सांगितलं असेल याचा विचार आता नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी करू लागले आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा द्राक्ष घेऊन पोबारा केला आहे. त्यांची परिस्थिती तर अक्षरशः बिकट झाली आहे.
तेजपालसिंह कुशवाह ऊर्फ राहुलभाई आणि आशिष मिश्रा दोघेही राहणारे दिल्ली येथील असून दोघांनी हा गंडा घातला आहे. यामध्ये प्रती क्रेट 25 रुपये कमिशन व्हेजिटेबल कंपनीला मिळणार होते. तर यातील महत्वाची बाब म्हणजे पहिल्या टप्प्यात जवळपास 78 लाख व्यापाऱ्यांनी कंपनीला दिले होते.
दुसऱ्या टप्प्यात जवळपास 88 लाख रुपये किंमतीचा माल घेऊन त्यांनी पोबारा केला. 1 मार्चला पैसे मिळतील असे सांगितले होते. मात्र वारंवार माहिती घेऊन कुठलाही संपर्क होत नसल्याने व्हेजिटेबल कंपनी आणि शेतकऱ्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.