नाशिक : नाशिक शहरातील गुन्हेगारी काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. नाशिकच्या शालिमार ( Nashik Shalimar )भागातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी काहीटोळक्यांनी शक्कल लढवली होती. मात्र ही लढवलेली शक्कल टोळक्यांच्या चांगलीच अंगलट येणार आहे. हप्ते घेण्यावरून शालीमार परिसरात धक्कादायक घटना ( Nashik Crime News ) घडल्याचे समोर आले आहे. नेहरू गार्डन परिसरात खाद्य पदार्थ विक्रीची केल्यानंतर पार्किंग मध्ये लावलेली गाडी पेटवून दिल्याची बाब समोर आली आहे. जाळपोळ करून दहशत निर्माण करण्यासाठी लढवलेली ही शक्कल टोळक्याच्या तुरुंगात घेऊन जाणार आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरुण भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरात दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरूणांकडून दहशत निर्माण करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. यामध्ये जाळपोळ करण्याबरोबरच हातात कोयता घेऊन हल्ला करणे असे विविध घटना समोर येत आहे.
शालीमार परिसरातील नेहरू गार्डन परिसरात खाद्य पदार्थ विक्री करणारे दीपक कपिले चारचाकीत दुकान चालवतात. व्यवसाय झाल्यानंतर कपिले हे गाडी जिमखाना येथील पार्किंगमध्ये लावून देतात.
घाऱ्या नावाच्या तरुणासह चार ते पाच तरुणांनी जिमखाना येथे जाऊन गाडी पेटवून देत पळ काढला आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे याच तरुणांनी कपिले यांच्याकडे हप्ता मागितला होता. तो न दिल्याने ही घटना घडल्याची बाब समोर आली आहे.
या आगीच्या घटनेत गाडीसह संपूर्ण माल जाळून खाक झाला आहे. ही बाब भद्रकाली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले होते. त्यानंतर आग त्यानंतर आग विझवली. त्यानंतर ही घटना समजतात इतर व्यावसायिकही घटनास्थळी दाखल झाले होते.
संशयित आरोपी हे तक्रारदार कपिले यांच्याकडून नेहमी पैसे घेऊन जात होते. मात्र रविवारी पैसे न दिल्याने टोळक्याने राग धरून ही जाळपोळ केल्याची बाब समोर आली आहे. या घटनेने व्यवसायिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.