नाशिक : मागील वर्षी गंगापुर पोलिस ठाण्यात राजस्थानच्या माजी मंत्र्याच्या मुलाच्या विरोधात सुशील भालचंद्र पाटील याने तक्रार दिली होती. त्यामध्ये त्याने पैसे घेऊन जाहिरातीचे टेंडर न दिल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे पाटील याची तक्रार चर्चेचा विषय ठरली होती. त्यावर स्वतः ट्विट करून संबंधित राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाने ट्विट करून माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण देशात पाटील हा चर्चेत आला होता. त्यानंतर याच पाटीलच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अनिल आव्हाड यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. त्यावरून खळबळ उडाली होती. त्यात संशयित सुशील पाटील याचे नाव आल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली होती.
मंत्र्याचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगत विश्वास संपादन करत अनिल आव्हाड यांना संशयित आरोपी सुशील पाटील याने गंडा घातला आहे. त्यावरून त्याला नुकतीच नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.
शासकीय नोकरीला आणि टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून जवळपास 2 कोटी 76 लाखांना चुना लावला होता. गेल्या अनेक दिवसांपासून तोयया स्वीय सहायक सुशील पाटील हा फरार होता. त्याला नुकत्याच गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
सुशील पाटील याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यामध्ये तब्बल पाच वर्षे आव्हाड आणि पाटील ही संपर्कात होते. त्यात विश्वास संपादन करत पाटील याने आव्हाड आणि त्याच्या नातेवाईकांना गंडा घातला आहे.
सुशील पाटील याने मंत्र्याचा स्वीय सहाय्यक असल्याचे भासविण्यासाठी फोटो दाखवत विश्वास संपादन केला होता. त्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचे ओळख असल्याचे सांगण्यासाठी त्याने फोटो काढले होते. त्यामुळे सुशील पाटील हा चर्चेचा विषय ठरत आहे.
सुशील पाटील हा नाशिकच्या लोचण अपार्टमेंटमध्ये मधूबन कॉलनीत मखमलाबाद नाका परिसरात राहणाराच असल्याने संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून पोलिस दलातही खळबळ उडाली आहे.