नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात योगेश मोगरे या कंपनी मालकाची हत्या झाली होती. ही हत्या का करण्यात आली याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. व्यवसायातून ही हत्या करण्यात आली का. काही दुश्मनी आहे का? असे सवालही उपस्थित केले जात होते. मात्र, नाशिक शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना घडली याचा कुठलाही ठोस पुरावा मिळत नव्हता. सीसीटीव्हीत कुठेली दृश्य कैद झालेल नव्हते. त्यामुळे मोगरे खून प्रकरणातील तपास करण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसांवर होते. मात्र, अखेर पोलिसांनी त्यामध्ये यश आले असून मुख्य संशयित मात्र यामध्ये फरार आहे.
हरियाणामधील दोघे संशयितांनी ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला संशयित आरोपी हा अल्पविन असून मुख्य आरोपी हा अजितसिंग सत्यवान लठवाल असं त्याचे नाव असून नाशिक पोलिसांचे दोन पथक त्याच्या मागावर आहे.
खरंतर यामध्ये हे दोन्ही आरोपी हे हरियाणा येथून मुंबईत मौजमजा करण्यासाठी आणि जातांना एखाद्या श्रीमंत व्यक्तीची लूट करून फरार होणे. हा त्यांचा उद्देश असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यात मुंबईतून बाहेर पडत त्यांनी याच शोधात नाशिक गाठलं होतं.
याच दरम्यान रात्रीच्या वेळेला योगेश मोगरे हे आपल्या कंपनीतून घरी निघाले होते. याच वेळेला मोगरे हे पाथर्डी फाटा येथे दररोजच्या प्रमाणे सिगारेट घेण्यासाठी थांबले होते. सिगारेट घेऊन परत निघालेले असतांना त्यांच्या कारजवळ दोघे जण आले.
यामध्ये योगेश मोगरे यांनी चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना प्रतिकार केला. यामध्ये दोघांकडे धारधार शस्र असतांना मोगरे यांनी त्यांना प्रतिकार करणे महागात पडले आहे. त्यात त्या दोघांनी पोटात गंभीर वार केले होते. त्यात मोठ्या प्रमाणात मोगरे यांचा रक्तस्राव झाला होता.
त्यानंतर त्यांना काही नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये मोगरे यांनी सिगारेट घेण्यासाठी उतरले नसते तर ही बाब घडली नसती असंही बोलले जात आहे.