नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात सोन साखळी चोरीच्या घटनांना आळा बसला होता. त्यामुळे महिला वर्गातील भीतीचे वातावरण काहीसे कमी झाले होते. मात्र, नाशिकच्या इंदिरानगर परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले. पुन्हा एकदा सोन साखळी चोरीचा जुना पॅटर्न समोर आला आहे. दुचाकी वरुन जवळ येऊन थांबतात आणि पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडतात. अशीच घटना इंदिरानगर येतहे घडली आहे. चेतनानगर परिसरात ही घटना घडली आहे. नातवाला सोबत घेऊन औषधे घेण्यासाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून एक लाख रुपयांची सोन्याची पोत ओरबाडून नेली आहे. दुचाकीवरुण आलेल्या दोघांनी केलेल्या या कृत्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी चोरांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
सोन साखळी ओरबडल्यानंतर आजींनी प्रसंगावधान राखल्याने खरंतर कुठलीही दुखापत झाली नाही. यामध्ये एक लाख रुपयांच्या किंमतीची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले आहे.
रात्री आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्यानंतर सोनसाखळी चोर पुन्हा सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. चेतनानगर येथील राहणाऱ्या प्रमिला सोनवणे यांची पोत चोरीला गेली आहे. मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी गेलेल्या महिलेलाच चोरट्यांनी लक्ष केल्याचे समोर आले आहे.
खरंतर समोर जोरात येणाऱ्या दुचाकीला पाहून व्यक्ति घाबरते आणि त्याचाच फायदा घेऊन दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोनं लंपास केले आहे. याबाबत प्रमिला सोनवणे यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर पोलिस या घटनेनंतर सीसीटीव्हीचा आधार घेऊन चोरट्यांचा शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे आता चोर पोलिसांच्या हाती लागतात का? महिलांच्या मनात निर्माण झालेली भीती कारवाई करून दूर करतात का? आणि चोरीला गेलेले सोनं परत मिळवून देतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.