नाशिक : खरंतर काही गुन्हे हे सुरुवातीला दाखल झाल्यानंतर त्यामध्ये तक्रारदारांनी केलेल्या आरोपावरून अंदाज लावला जात असतो. मात्र, त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर येत असतात. त्यामध्ये अनेक गुन्ह्यामध्ये पोलिसांचा तपासात तक्रारदारच आरोपी झाल्याचे समोर आले आहे. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. यामध्ये काही महिन्यांपूर्वी नाशिक शहर पोलिसांत स्वप्नील रमेश विसपुते यांनी घरासमोरून स्वतःच्या मालकीची कार चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्यामध्ये तक्रारदार याने घरासमोर साडेनऊ लाख रुपये किंमतीची कार चोरीला गेल्याचं म्हंटलं होते. पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून कार चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
स्वप्नील रमेश विसपुते यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर तपास सुरू केला होता. यामध्ये हुंडाई कंपनीची वेन्यू कार चोरीला गेली होती. त्यामध्ये साडे नऊ लाख रुपये किंमतीची कार चोरीला गेली होती.
त्यावरून पोलिसांनी तपास करण्यासाठी एक पथक रवाना केले होते. घरासमोर ही गाडी चोरीला गेल्याचे तक्रारदार याचे म्हणणे होते. त्यावरून तांत्रिक तपास करत असतांना चोरीचा उघड झाला आहे.
यामध्ये घरासमोरून गाडी चोरीला गेली त्यावेळी मालक कुठे होते. वेळ आणि इतर बाबी लक्षात घेता परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यामध्ये ही कार मालकानेच चोरल्याचे समोर आले. त्यामागील कारण स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी चोरोला शोधले आहे.
गुन्ह्याचा तपास करत असतांना तांत्रिक विश्लेषण करून ही कारवाई करण्यात आली आहे. चोरी ही मालकानेच केल्याचे तपासात समोर आल्यानं पोलिसही चक्रावून गेले आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलिस कर्मचारी सुनील गांगुर्डे, हेमंत बेजेकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला आहे. यामध्ये पुढील तपासात काय समोर येतं हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.