नाशिक : चोरी करण्यासाठी खरंतर चोरटे वेगवेगळी शक्कल लढवत असतात. त्यामुळे ते कधी यशस्वी होतात तर कधी अपयशी ठरतात. मात्र, नंतर चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांच्या हातीही लागतात. त्यावेळेला चोरीचा ( Crime News ) प्रकार पाहून अनेकदा पोलिसही चक्रावून जातात. त्यात महिलांनी जर चोरी केलेली असेल तर मग त्याची अधिकच चर्चा होते. त्यात आता बँकेत पैसे भरतांना काळजी घ्या असं आवाहन नाशिक शहर पोलिसांना करण्याची वेळ आली आहे. नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बँकेत चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमधून उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये बॅंकेचे अधिकारी सुद्धा या चोरीच्या घटनेने धास्तावले आहे.
नाशिकमध्ये बँकेत पैसे भरतांना काळजी घ्या असे आवाहन करत पैसे चोरी करणाऱ्या महिला दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन करीत आहे. त्याचे कारण म्हणजे बँकेत पैसे भरण्यास गेलेल्या व्यक्तीच्या बॅगेतून रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे.
महिला चोरांची टोळी कार्यरत असल्याची बाब समोर आली आऊन बँकेत या महिला सक्रीय असल्याचे आढळून आले आहे. पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या शेजारी महिला बसून राहतात. ग्राहक सही करण्यासाठी किंवा काही कारणासाठी उठताच हातचलाखीने रोकड काढून घेतात.
असाच प्रकार अंबड येथील एका बँकेत घडला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. सही करण्यासाठी उठलेल्या ग्राहकाची 32 हजार रुपयांची रोकड लंपास केली असून ग्राहकाने दिलेल्या तक्रारीवरून दोन महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
बँकेत ग्राहकांचे लक्ष विचलित झाल्यास काही क्षणात रोकड लंपास करणारी महिलांची टोळी नाशिकमध्ये सक्रिय असल्याचं समोर आले आहे. #Crime #bank #cctv #women pic.twitter.com/OUrj2KPyLD
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) March 20, 2023
बँकेत सुरक्षा रक्षक असतात, सीसीटीव्ही असतात. याची कुठलीही भीती न बाळगता महिला चोरी करत असल्याचे समोर आल्याने बँकेतील कर्मचारी सुद्धा धास्तावले आहे. बँकेत सर्रासपणे अशा चोरीच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली असून अंबड पोलिस महिलांचा शोध घेत आहे.