काळीज पिळवटून टाकणारी घटना, वीस दिवसांपासून ती मृत्यूला हुलकावणी देत होती, उकळत्या तेलात…

| Updated on: Apr 03, 2023 | 10:59 AM

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील एका चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा असं सांगण्याची वेळ वारंवार येत आहे.

काळीज पिळवटून टाकणारी घटना, वीस दिवसांपासून ती मृत्यूला हुलकावणी देत होती, उकळत्या तेलात...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिकच्या सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. अवघ्या सहा वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पालकांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. घरात स्वयंपाक सुरू असतांना अचानक खेळत असलेली सहा वर्षांची मुलगी उकळत्या तेल्याच्या मोठ्या कढईत पडली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजून निघाली होती. त्यानंतर काही मिनिटांनी ही बाब निदर्शनास आल्यानंतर सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर मुंबई नाका परिसरातील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा आडगाव येथील मेडिकल कॉलेज येतही उपचार सुरू होते. मात्र, चिमुकुलीच्या मृत्यूची झुंज अपयशी ठरली.

खरंतर अनेकदा लहान मुलांकडे दुर्लक्ष झाल्यानंतर अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये अनेकदा लहान मुलांचा जीवही गेला आहे. सटाणा येथील लखमापूर येथील घटनाही अशीच काहीशी असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

घरात विविध वस्तु बनविण्याचे काम सुरू होते. खेळत असलेली चिमूरडी पळत पळत आली आणि थेट उकळत्या तेलाच्या कढईत पडली होती. त्यात ती मोठ्या प्रमाणात भाजली होती. तिचा जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न पालक आणि डॉक्टर करीत होते.

हे सुद्धा वाचा

तब्बल वीस दिवस चिमुकुली मृत्यूशी झुंज देत होती. उपचारासाठी आई वडिलांनी अनेक हॉस्पिटल बदलले मात्र त्यास यश आले नाही. चिमूकलीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. सटाणा पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिकचा तपास सुरू आहे.

सहा वर्षाच्या चिमूकलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पालकांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. मुलीच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीही हाती राहिलं नाहीये.

आपली मुलं खेळत असतांना त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देण्याच गरज आहे. डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवा असं सांगण्याची वेळ वारंवार येत आहे.

यापूर्वी नाशिकमध्ये गुलाबजामूनच्या पाकात पडून एका चिमूकलीचा मृत्यू झाला होता. तर अंबड परिसरात गॅलरीतून पडून चिमूकल्याचा मृत्यू झाला होता. तर सातपुर परिसरात झोका खेळता खेळता फास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्यामुळे मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.