नाशिक : खरंतर जमीन नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे पाहता अत्यंत किचकट प्रक्रिया असते. त्यात जर मृत व्यक्तीच्या वारसाला नाव लावायचे असेल तर कागदपत्रे नावावर करता करता दमछाक होत असते. पण नाशिक मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी दखल न घेतल्याने न्यायायलात धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजी जीवंत असताना नातवाने आजीला मृत दाखवत जमीन नावावर करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना उगडकिस आल्याने खळबळ उडाली आहे.
सत्तरवर्षीय वयोवृद्ध आज्जीच्या ऐवजी नावात साधर्म असल्याचा फायदा घेत मृत महिलेचा मृत्यूचा पुरावा दाखत आणि आजीचा वारसदार असल्याचं सिद्ध करत सात बारा उताऱ्यावर नाव लावल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
निफाड तालुक्यातील मुखेड येथील सरस्वतीबाई संपत महाले या आजीच्या नावावर दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथे जवळपास अडीच हेक्टर शेती आहे. तीच शेती लाटण्यासाठी आजीचा नातू विलास पांडुरंग पवार याने कारणामा केला आहे.
विलास पांडुरंग पवार हा नाशिकच्या गंगापुर रोड परिसरात राहतो. दुसऱ्याच महिलेच्या मृत दाखल्याचा आधार घेत खोटे कागदपत्रे बनवून तक्रारदार सरस्वतीबाई महाले यांचे नावे कमी करत स्वतःचे नाव लावून घेत जमीन लाटली होती.
खरंतर ही प्रक्रिया करत असतांना महसूल अधिकारी बारकाईने तपासणी करत असतात. मात्र, या प्रकरणात तसे न करता विलास पंगत या नावाची चुकीच्या पद्धतीने नोंद केल्याचे उघडकीस आले आहे.
तक्रारदार यांनी 2022 मध्ये उतारा काढल्यानंतर ही बाब उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. नंतर पोलिस अधिक्षक यांच्याकडेही धाव घेतली होती. मात्र, तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून अधिकचा तपास केला जात आहे.