नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वैतरणा धरणाच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण झाला आहे. खरंतर सुरक्षा रक्षक नसल्याने अनेक पर्यटक तिथे जाऊन राहतात. पार्टी करतात. धरणात पोहतात. हे प्रकार सर्रास घडत असतांना अचानक एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये नुकतेच वैतरणा धरणावर नाशिक शहरातील दहा मित्र वैतरणा धरणावर मुक्कामी सहलीला गेले होते. टेन्ट घेऊन मुक्कामी गेलेल्या मित्रांनी पार्टी केली आणि सकाळच्या वेळेला धरणात पोहण्यासाठी उड्या मारल्या मात्र यामध्ये त्यात एक जण पोहता येत नसल्याने बुडून मृत्यूमुखी पडला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अरुण जगदीश जाधव असं असून पाथर्डी फाटा परिसरात राहणारा होता.
एका नामांकित कॉलेजमधील दहा विद्यार्थी मुक्कामी ट्रीप साठी वैतरणा धरणावर गेले होते. त्यामध्ये सायंकाळी हे सर्व तरुण टेन्ट घेऊन गेले होते. रात्रभर पार्टी झाल्यावर तिथेच मुक्काम राहिले आणि सकाळी पोहण्याचा मोह झाल्याने धरणात उड्या मारल्या.
सकाळी घरी जातांना अंघोळ करून जावं म्हणून पाण्यात उद्या मारल्या होत्या. मात्र यामध्ये अरुण ला पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने त्याचा बुडून नाका तोंडात पाणी गेले होते. त्यात मित्रांनी आणि इतर नागरिकांनी त्याला बाहेर काढले होते.
घोटी ग्रामीण रुग्णालयात अरुण ला नेण्यात आले मात्र तोपूर्वी त्याचा उपचारा आधीच मृत्यू झाल्याच समोर आले. अरुणला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर घोटी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.
या घटनेमुळे पर्यटन स्थळावरील सुरक्षेचा मुद्दा निर्माण झाला आहे. त्यामध्ये धरण काठावर जाऊन थेट लोकं मुक्कामी राहत असल्याने भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.