नाशिक : नाशिक मधील बहुचर्चित खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल दहा दिवसांनी नाशिक शहर पोलिसांना बच्चू कर्डिले या वृद्धाचा खून का आणि कसा झाला याचा शोध घेण्यात यश आले आहे. 26 नोव्हेंबरला नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या कर्डिले मळ्यात दरोडा पडल्याची घटना घडली होती, त्यामध्ये ज्यांचा खून झाला ते वृद्ध व्यक्ती बच्चू कडू यांचा डोक्यात आणि अंगावर धारधार शस्राने वार करून दागिने आणि पैसे असलेली कोठी लांबविली होती, त्यामुळे दरोडा आणि खुनाचा गुन्हा नाशिक शहर पोलीसांनी दाखल केला होता. त्याच उलगडा होत असतांना शहर पोलीसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. बच्चू कर्डेले या वृद्धाचा खून हा त्यांच्याच नातवाने एका विधी संघर्शीत बालकासोबत कट रचून केल्याच उघड झाले आहे. कुणालाही संशय येऊ नये म्हणून म्हणून विधीसंघर्षित बालकाने बुरखा परिधान करत कोयत्याने वार करून खून केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.
कर्डिले यांचा खून हा प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांना असून खुनाचा आणि दरोडयाचा मास्टर माइंड हा त्यांचाच पुतण्या असल्याचे समोर आले आहे.
खुनाचा कोणाला आपल्यावर संशय येऊ नये याकरिता घरातील दागिने आणि पैशांची कोठी घेऊन काटा काढण्याचे सांगून पुतण्या इतर कुटुंबासोबत हळदी समारंभाला उपस्थित होता.
पोलीसांनी खुनाचा तपास करत असतांना सीसीटीव्ही आणि इतर अनेक मार्गाने शोध घेतला मात्र खुनाचा शोध लागत नव्हता, मात्र तांत्रिक बाबींचा आधार घेऊन खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या घटनेतील संशयित विधी संघर्षित बालकाने चोरून नेलेली कोठी पोलिसांना बच्चू कर्डेले यांच्या शेजारच्या शेतातील विहिरीत मिळून आली आहे.
या कोठीत गुन्ह्यात वापरलेला बुरखा, कोयता आणि सोन्याचे दागिने आणि काही कपडे आणि इतर वस्तू मिळून आल्या असून त्या आधारे देखील पुढील तपास केला जात आहे.
या खुनाच्या घटनेत आणखी नातेवाईक असण्याची शंका पोलिसांना असून त्या दृष्टीने अधिकचा तपास केला जात असून या गुन्ह्यात आणखी कोणत्या बाबी समोर येतात हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.