मंदिरातील महत्त्वाच्या वस्तूंवर चोरट्यांनी मारला डल्ला, परिसरातील नागरिक आक्रमक

| Updated on: Aug 15, 2023 | 7:59 AM

Nashik News : देवळातून काही अशा घटना चोरीला गेल्या आहेत की, नागरिकांनी देवाला कडेकोट पहारा देण्याची स्थिती नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी तालुक्यात घडली आहे.

मंदिरातील महत्त्वाच्या वस्तूंवर चोरट्यांनी मारला डल्ला, परिसरातील नागरिक आक्रमक
nashik igtpuri temple
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक : चोरट्यांना सुध्दा नेम नाही असं काहीसं नाशिकच्या (Nashik News) इगतपुरी (Igatpuri crime news) तालुक्यात कानावर पडतं आहे. कारण त्या भागात चोरट्यांनी चक्क देवळातील काही वस्तूंवर डल्ला मारला आहे. चौरट्याने देव सोडला तर एकही वस्तू तिथं ठेवली नसल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये (nashik police station) दाखल झाली आहे. पोलिसांनी सीसीटिव्हीचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे. चोरी झाल्याची माहिती व्हायरल होताचं परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे, त्याचबरोबर परिसरातला चोर असावा अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली आहे. त्याचबरोबर काही नागरिकांनी मंदीराला कडेकोट पहारा देण्याचा विचार केला आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यात अधिकमास आलेला आहे. त्यामूळे संपूर्ण महाराष्ट्रात वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. श्रावण महिन्यात अनेकजण शंकराची व देवांची आराधना करत आहेत. त्याचबरोबर दानधर्म सुध्दा करीत आहेत. त्यामुळे आपसूकच भक्तांची पावलं देवाच्या दर्शनासाठी मंदिराकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या मंदीरात अनेक वस्तू दिसत असल्यामुळे चोरट्यांची नजर देखील मंदिरावर आहे. इगतपुरी शहरातील जागृत देवस्थान व गावदेवी असलेल्या शितला माता मंदिर, तीन लकडी येथील बालाजी मंदिर, नवा बाजार येथील शिवमंदिरात अज्ञात चोरट्यानी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरात चोरी केली आहे.

हे सुद्धा वाचा

मंदीरातील दानपेट्या फोडून त्यातील रोकड, समई, दिवे, मंदिरातील घंटा अशा वस्तू चोरुन नेल्या आहेत. यामुळे शहरातील नागरिकात संतापाचे वातावरण पसरले आहे. एकाच दिवशी इतकी मंदिर फोडल्यामुळे नागरिकांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे.