नाशिक : नाशिकच्या अशोकनगर परिसरात असलेल्या शास्वत बारमध्ये घडलेलया धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री सातपुरच्या श्रमिकनगर परिसरातील तिघे अशोकनगर येथील शास्वत बारमध्ये आले होते, दारू पिले आणि जेवण केले त्यानंतर वेटरने बिल आणून दिले. मात्र, बिल न दिल्यावरून वाद तिघांनी वाद घातला, त्यामध्ये वेटरला बेदम मारहाण करण्यात आली. वेटर नितीशकुमार सिन्हा यांचा यामध्ये जबर मारहाण झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वेटर सिन्हा यांच्या नातेवाइकांनी बार मालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सिन्हा यांच्या मृत्यूनंतर उघडकीस आली आहे.
वेटर नितीशकुमार सिन्हा हे मध्यरात्री घरी आले होते. सिन्हा यांच्या छातीत मार लागल्याने त्रास होत होता, बार मालकाने सिन्हा यांना मेडिकल मधून पेनकीलरची गोळी आणून दिली.
वेटरने जेवणानंतर पेनकीलरची गोळीही घेतली आणि मध्यरात्री घरी आले, आणि झोपून गेले, त्यानंतर पहाटे पासून सकाळपर्यन्त त्रास होत असल्याची कल्पना त्यांनी पत्नीला दिली होती.
त्यानंतर सिन्हा यांना त्रास होत असल्याने कुटुंबियानी प्रथम सातपूर कॉलनीपरिसरातील सार्थक हॉस्पिटलमध्ये नेले होते.
मात्र, त्यांनी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच नितीशकुमार सिन्हा यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, वेळीच दखल न घेतल्याने बार चालकासह तिघा संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास वेटर सिन्हा यांच्या कुटुंबियांनी नकार दिला होता.
याबाबत सातपुर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत तपास करत चौकशी सुरू केली आहे, सिन्हा यांच्या नातेवाईकांना कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
वेटर नितीशकुमार सिन्हा हे गेल्या 10 वर्षांपासून बारमध्ये काम करीत होते, नितीशकुमारच्या मागे वृद्ध आई, दोन भाऊ, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे.
या घटनेनंतर शास्वत बार प्रकरणी वारंवार हाणामारीच्या घटना समोर येत असल्याची ओरड नागरिकांमध्ये होत असून या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.