खंडणीसाठी लावली भन्नाट आयडिया…सीसीटीव्हीमुळे झाला खंडणीचा भांडाफोड, घटना एकदा पाहाच…

| Updated on: Sep 14, 2022 | 1:58 PM

गंगापूर पोलीसांनी याबाबत सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रार अर्जानुसार चौकशी करून गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.

खंडणीसाठी लावली भन्नाट आयडिया...सीसीटीव्हीमुळे झाला खंडणीचा भांडाफोड, घटना एकदा पाहाच...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिकमध्ये खंडणी (extortion) उकळवण्यासाठी एकाने लावलेली शक्कल अनेकांच्या भुवया उंचावत आहे. विशेष म्हणजे ज्याने ही शक्कल लढवली होती त्याने केलेल्या सर्व कृत्याचा सीसीटीव्हीचा (CCTV) व्हिडिओच समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार उच्चभ्रू वस्तीत असलेल्या एका स्वीटच्या दुकानात घडला आहे. सावरकर नगर परिसरातून एका व्यक्तीने खाद्यपदार्थ ऑर्डर केले होते. हे पदार्थ घेऊन तो दुकानाबाहेर पडला आणि काही वेळेतच पुन्हा खाद्यपदार्थ घेऊन स्वीटच्या दुकानात परत आला. मात्र,त्यावेळी त्याने खाद्यपदार्थामध्ये किडा असल्याची तक्रार केली. नंतर, स्वीटच्या दुकान (Sweet Shop) मालकाला फोन करून तुमच्या खाद्यपदार्थामध्ये किडा आढळला आहे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली होती.

स्वीटच्या मालकाने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र, संबंधित व्यक्ति ऐकण्याच्या तयारीत नव्हता. त्यामुळे स्वीट दुकान मालक आणि कर्मचारी हतबल झाले होते.

मात्र, नंतर स्वीटच्या दुकान मालकाला व्हिडिओ व्हायरल करेल नाहीतर दोन लाख रुपया द्या अशी मागणी करत मिटवण्यासाठी थेट खंडणीच मागितली.

नंतर मात्र, मालकांचा नंबर असल्याने त्याने थेट फोन करून आणि व्हॉटसअपवर मेसेज करून कधी एक लाख रुपये तर कधी पन्नास हजार रुपयाची मागणी केल्याचे समोर आले आहे.

यानंतर मात्र स्वीट दुकान मालकाने सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपासणी केली. यामध्ये चक्क तोच तक्रारदार खाद्यपदार्थांमध्ये किडा टाकत असल्याचे दिसून आले आहे.

स्वीट दुकान मालक दीपक चौधरी यांनी थेट याबाबत स्वीट दुकान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत कळवत मदतीची मगणी केली होती.

प्रकरण गंभीर असल्याचे पाहून सर्वच संघटनेचे पदाधिकारी आणि स्वीट दुकान मालक यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

गंगापूर पोलीसांनी याबाबत सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रार अर्जानुसार चौकशी करून गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.