नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांना अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे. शिक्षणसंस्थेकडून 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) ताब्यात घेतलेल्या आणि चौकशीनंतर घरी परतलेल्या वैशाली वीर-झनकर या फरार झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला असल्यामुळे सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्यामुळं एसीबीनं समन्स बजावत त्यांना घरी पाठवलं होतं. सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, दुपारी अडीच वाजेपर्यंत वैशाली न्यायालयात हजर न झाल्यामुळे त्यांना लाचलुचपत विभागानं फरार घोषित केलं आहे. (Education Officer Vaishali Jhankar declared absconding in bribery case)
सरकारनं मंजूर केलेल्या दोन शिक्षण संस्थांशी संबंधित असलेल्या शाळांमध्ये 20 टक्के अनुदानावर नियमित वेतन सुरु करण्याचा कार्यादेश काढण्यासाठी वैशाली झनकर यांनी 9 लाख रुपयांची लाच मागितली होती. शेवटी 8 लाख रुपयांवर तडजोड झाली. या प्रकरणात तक्रारदारानं ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानंतर एसीबीचं पथक नाशिकला रवाना झालं. त्यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर सापळा रचला. लाच स्वीकारण्यासाठी एक व्यक्ती पुढे आल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं. तर डॉ. झनकर या क्लास वन अधिकारी असल्यामुळे त्यांच्या घरासह मालमत्तेची झडती रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
चौकशीनंतर झनकर या घरी परतल्या. महिला असल्यामुळे सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्यामुळं एसीबीनं समन्स बजावत त्यांना घरी पाठवलं होतं. सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, दुपारी अडीच वाजेपर्यंत वैशाली न्यायालयात हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले दोन संशयित वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वीर यांच्यासोबत हमी घेतलेल्यांवर कारवाई करणं अपेक्षित असल्याचं सरकारी वकील असर मिसर यांनी म्हटलंय.
इतर बातम्या :
आई-वडील हॉलमध्ये, बेडरुमची कडी लावून आधी मुलाला संपवलं, नंतर आत्महत्या, घटनेमागील कारण धक्कादायक !
VIDEO : नाशिकमध्ये महिलेचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न, पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप
Education Officer Vaishali Jhankar declared absconding in bribery case