तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात, महिला आमदार भडकल्या…हिवाळी अधिवेशनातच लक्षवेधी मांडते म्हणत कुणाला दिला इशारा…

| Updated on: Dec 13, 2022 | 5:44 PM

तरुणाईसाठी नशा करण्यासाठी लागणारे अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा थेट आरोप आमदार फरांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केला.

तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात, महिला आमदार भडकल्या...हिवाळी अधिवेशनातच लक्षवेधी मांडते म्हणत कुणाला दिला इशारा...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिक शहरातील तरुणाई सध्या अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालली असल्याची कैफियत नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडली आहे. नुकतीच नाशिकच्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अखर्चित निधीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. पण यावेळी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे शहरातील अवैध धंदे आणि अमली पदार्थ विक्री. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. नाशिकच्या टपरीवर, गल्लीबोळात अमली पदार्थ मिळत असून पोलिसांचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याची तक्रार भाजपच्या आमदार देवयांनी फरांदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत थेट तक्रार केली. यावरून पोलीसांच्या कामगिरीवर लोकप्रतिनिधी यांनी बोट ठेवल्याने संपूर्ण बैठकीत विविध मुद्द्यावरून पोलीसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले.

नाशिकच्या महाविद्यालयीन परिसरात अनेक तरुण कारवाई दरम्यान नशेत असल्याचे समोर आले आहे, अनेकदा पोलीसांच्या कारवाई ड्रग्स, इतर नशा करण्यासाठी वापरले जाणारे अमली पदार्थ आढळून आले आहे.

तरुणाईसाठी नशा करण्यासाठी लागणारे अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा थेट आरोप आमदार फरांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केला.

हे सुद्धा वाचा

याची तातडीने दखल घेतली नाही तर थेट हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे म्हंटले आहे, त्यामुळे पोलीसांनी याची लागलीच प्रतिक्रिया दिली आहे, 112 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

अमली पदार्थ सर्रासपणे मिळत असल्याने तरुणाई गुन्हेगारीकडे वळत आहे, याबाबत काही तक्रार असल्यास हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा 15 मिनिटांत पोलीस कारवाई करतील अशी ग्वाही स्वतः पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

विशिष्ट कोड सांगून कुठेही अमली पदार्थ मिळत असल्याचाही आरोप करण्यात आल्याने पोलीसांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे, त्यामुळे येत्या काळात काय कारवाई होते, आमदार काय भूमिका घेतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.