नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 4 येथे वास्तव्यास असलेले प्रकाश शेट्टी (Navi Mumbai Burglary) यांचे घर काही दिवसांपासून बंद होते. याचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून (Navi Mumbai Burglary) सुमारे 4 लाख 80 हजार रुपये किमतीचं सोनं लंपास केलं आहे (Navi Mumbai Burglary Gold Ornaments Cost Of Rs 4 lack 80 thousands Theft From Airoli Varsha Society).
ऐरोलीच्या सेक्टर 4 येथील वर्षा सोसायटी येथे आपल्या प्रकाश शेट्टी वास्तव्यास आहेत. ते सासूसोबत येथे राहतात तर त्यांची पत्नी पुण्याला कामाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या सासू गावाला गेल्या आहेत. यादरम्यान प्रकाश शेट्टी हे एकटेच घरामध्ये राहत होते.
23 फेब्रुवारीला प्रकाश शेट्टी हे त्यांची पत्नी पौर्णिमा शेट्टी यांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. यादरम्यान, काही अज्ञात चोरट्यांनी घर रिकामे असल्याचा फायदा घेत 1 मार्च 2021 रोजी घरामध्ये चोरी केली. शेजाऱ्यांनी फोन केल्यानंतर प्रकाश शेट्टी यांना त्यांच्या घरी टोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी घराच्या सेफ्टी दरवाजाला लावलेल्या कुलुपाचा कोयंडा कापलेला होता. तर आतील लाकडी दरवाज्याचा लॅचलॉक देखील तोडलेलं होतं.
चोरट्यांनी बेडरुममधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील 1 सोन्याची चेन (40 ग्रॅम), 1 सोन्याचे मंगळसूत्र (20 ग्रॅम), 1 सोन्याचे ब्रेसलेट (20 ग्रॅम), सोन्याच्या 8 अंगठ्या (प्रत्येकी वजन 5 ग्रॅम) 1 सोन्याची रुद्राक्ष माळ (40 ग्रॅम), असे एकूण सुमारे 4 लाख 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात रबाळे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात प्रकाश शेट्टी यांचे नातेवाईक यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आली आहे.
यासंदर्भात रबाळे पोलीस स्टेशनचे पीसीआय अमित शेलार यांनी सांगितले की, या घरफोडीचे सीसीटीव्ही फुटेज काढले असून यामध्ये तीन व्यक्ती चोरी करताना आढळले आहेत. हे चोर संशयित आरोपी असून लवकरच त्यांना पकडण्यात रबाळे पोलिसांना यश मिळेल असा विश्वास आहे. रस्त्यावरील देखील सीसीटीव्ही जमा करण्याचे काम सुरु असून अधिक तपास सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच, “नागरिकांना सुद्धा आवाहन करण्यात येते की, सोन्याचे अथवा किमती दागिने बंद घरामध्ये ठेवू नका. अनोळखी व्यक्तीला सोसायटीमध्ये सहज प्रवेश देऊ नका. सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक तैनात असल्यास चोरांपासून सावध राहता येते. तसेच, सोसायटीमध्ये सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे. याबाबत सोसायटींना नोटीस सुद्धा बजावल्या आहेत”, असंही ते म्हणाले.
धंदा जिलेबी विक्रीचा अन् काम वाहन चोरीचे, राजस्थानच्या तीन सराईत चोरट्यांना पुण्यात अटकhttps://t.co/B5wVOpxiLL#VehicleRobbery @PuneCityPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2021
(Navi Mumbai Burglary Gold Ornaments Cost Of Rs 4 lack 80 thousands Theft From Airoli Varsha Society)
संबंधित बातम्या :
इंधन दरवाढ होताच चोरांची चांदी, नवी मुंबईत गाडीतून पेट्रोल चोरीची घटना CCTV मध्ये कैद
इंदापुरातून चोरीला गेलेले 29 फ्रीज परभणीत सापडले
अहमदनगरमध्ये दरोडा अन् बीडमध्ये सोन्याची विक्री, दरोडेखोरास बेड्या