Navi Mumbai Crime : आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी करत चार महिलांची फसवणूक, ‘असा’ उघड झाला आरोपीचा बनाव

| Updated on: Aug 05, 2023 | 2:24 PM

मॅट्रीमोनिअल साईटवर जोडीदार शोधणे चार महिलांना चांगलेच महागात पडले आहे. आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी आरोपीने महिलांना गंडा घातला.

Navi Mumbai Crime : आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी करत चार महिलांची फसवणूक, असा उघड झाला आरोपीचा बनाव
आर्मी ऑफिसर असल्याचे सांगत चार महिलांची फसवणूक
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी मुंबई / 5 ऑगस्ट 2023 : हल्ली लग्न जमवण्यासाठी मॅट्रीमोनिअल साईटला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. विवाहेच्छुक तरुण तरुणी मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी मॅट्रीमोनिअल साईटवर नाव नोंदवतात. अनेकांना मनाप्रमाणे जोडीदार या साईटवर मिळतोही. पण अनेकदा फसवणुकीच्या घटनाही घडतात. अशीच एक घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. मॅट्रीमोनिअल साईटवर आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी करुन चार महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. हिंमतसिंग चौधरी असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. सध्या तो खारघर येथे राहत होता. याप्रकरणी खारघर पोलिसांनी चौधरी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची चौकशी केली असता त्याने अशा प्रकारे चार महिलांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

‘असा’ उघड झाला बनाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर येथील महिलेने लग्न जुळवण्यासाठी एका मॅट्रीमोनिअल साईटवर नाव नोंदवले होते. तेथे तिची ओळख आरोपीसोबत झाली. आरोपीने आपण आर्मी ऑफिसर असल्याचे महिलेला सांगितले. तसेच अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणे हाताळून मुंबईतील रॉमध्ये पोस्ट केल्याचा दावा केला. यानंतर जानेवारी 2022 मध्ये दोघांनी वांद्रे येथे छोटेखानी समारंभात लग्न केले. यानंतर दोघे खारघरला एकत्र राहू लागले.

लग्नानंतर पती कामावर जात नव्हता. तसेच भारतीय सैन्याच्या सेवेतही त्याने पत्नी म्हणून नोंद केली नाही. यामुळे लग्नानंतर महिलेला पतीच्या नोकरीबद्दल संशय आला. यामुळे तिने पतीची सर्व माहिती काढली. चौकशीत जे समोर आलं त्याने तिला धक्काच बसला. आरोपीने आर्मी ऑफिसर असल्याचे तिला खोटे सांगितले होते. आरोपीने महिलेकडून 3.5 लाख आणि 4 लाखांचे सोन्याचे दागिनेही बळकावले. त्यानंतर त्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. यानंतर महिलेने खारघर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

हे सुद्धा वाचा