Navi Mumbai Crime : तिच्या घरी गेला आणि टीव्ही लावायला सांगितला, तेवढ्यात… त्याच्या ‘त्या’ कृतीने हादरली महिला !

| Updated on: Sep 11, 2023 | 2:40 PM

आरोपी हा दुपारी पीडित महिलेच्या घरी गेला असता हा प्रकार घडला. घरी गेल्यावर त्याने पीडितेला टीव्ही लावण्याची विनंती केली होती, ती आतमध्ये गेल्यावर त्याने तिच्यासोबत...

Navi Mumbai Crime : तिच्या घरी गेला आणि टीव्ही लावायला सांगितला, तेवढ्यात... त्याच्या त्या कृतीने हादरली महिला !
Follow us on

नवी मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : राज्यभरातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतानाच दिसत (crime news) असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एका इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजाराम पाटील असे आरोपीचे नाव आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीने तक्रारदार महिलेला त्याच्या घराच्या सुरक्षेसाठी तिथे ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. नरेगाव येथे ती महिला रहात होती.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. पाटील यांनी शुक्रवारी दुपारी महिलेच्या घरी गेले आणि तिला टीव्ही सुरू करण्याची विनंती केली. महिलेमागोमाग तेही घरात शिरले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत नमूद केले. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपी पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूरच्या इसमाने केला नवी मुंबईतील महिलेचा लैंगिक छळ

अशीच एक आणखी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुसऱ्या घटनेत एका महिलेचा लैंगिक छळ करणे, तिचा पाठलाग करणे आणि तिला त्रास देणे, याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एका इसमाविरोधात गन्हा दाखल केला आहे. आरोपी हा कोल्हापूरचा रहिवासी असून तो कॉम्प्युटर सेंटरचा मालक असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत राहणाऱ्या एका 23 वर्षीय महिलेचा लैंगिक छळ करणे, पाठलाग करणे आणि तिला धमकावणे याप्रकरणी पोलिसांनी कोल्हापुरातील एका 50 वर्षीय व्यक्तीला अटक केली. ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2022 दरम्यान आरोपीने तिचा लैंगिक छळ केला, असे महिलेने तिच्या तक्रारीत नमूद केले आहे.

एकत्र काम करत असताना आरोपी तिला अयोग्यरित्या स्पर्श करायचा आणि त्याचा गुन्हा लपवण्यासाठी तो कामाच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद करायचा. त्या महिलेचे लग्न झाल्यानंतरही आरोपीने त्याची वाईट कामं सोडली नाहीत. उलट तो लग्नानंतरही सतत तिचा पाठलाग करत असे आणि तुझ्या पतीला तुझ्याबद्दल खोटनाटं सांगेन, असं सांगत आरोपी तिला धमकी द्यायचा, असेही फिर्यादीने तिच्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.