मुंबई : एनसीबी अधिकाऱ्यांनी नवी मुंबईच्या खारघर येथे मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने येथे एका ड्रग्ज तस्कराला पकडले आहे. तब्बल 2 किलोमिटरपर्यंत पाठलाग करुन अधिकाऱ्यांनी ही धडाकेबाज करावाई केलीये. विशेष म्हणजे अमली पदार्थविरोधी पथकाने ज्या ड्रग्ज तस्कराला पकडले आहे; तो मूळचा नायजेरियन नागरिक असून केनिथ इझी असे त्याचे नाव आहे. या तस्कराकडून तब्बल 200 ग्रॅम मोफिड्रॉन जप्त करण्यात आले आहे. या नायजेरिय ड्रग्ज तस्कराला पकडल्यानंतर आता मुंबई आणि उपनगरांतली ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे उघडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. (NCB Narcotics Control of Bureau arrests Nigerian drug peddler at Navi Mumbai Kharghar)
मिळालेल्या माहितीनुसार अमली पदार्थविरोधी पथकाला नवी मुंबईच्या खारघरच्या परिसरात ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. ड्रग्ज तस्करी करणारा हा तस्कर मूळचा नाजयेरियन आहे. ही माहिती समजताच, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ड्रग्ज पेडलरचा पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, एनसीबीचे अधिकारी मागावर असल्याचे समजताच या नायजेरियन तस्कराने पळ काढला. त्यानंतर तब्बल दोन किोलमिटरपर्यंत पाठलाग करत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या नायजेरियन तस्कराला ताब्यात घेतले. या ड्रग्ज तस्कराकूडन एनसीबीने तब्बल 200 ग्रॅम मोफीड्रॉन नावाचा ड्रग्ज ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांतसिहं राजपूतच्या मृत्यूनंतर मुंबई आणि उपनगरांत ड्रग्ज तस्करांचे मोठे जाळे समोर आले आहे. एनसीबी आणि मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अनेक कारवाया केल्या आहेत. दोन्ही विभागांनी विदेशी तसेच भारतीय अशा अनेक ड्रग्ज तस्करांना आतापर्यंत पकडले आहे. सध्या एक नायजेरीय तस्कर जाळ्यात अडकल्यामुळे अमलीपदार्थविरोधी पथकाच्या गळाला मोठा मासा लागल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईनंतर एनसीबीला ड्रग्ज तस्करीसंबंधी मोठी माहिती मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
चिया बिया । शानदार कमाई देणारी शेती, कमी जागेत मिळेल अधिक नफाhttps://t.co/qNvPFJK58T#chiaSeeds |#farming |#modern |#more |#profit
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2021
इतर बातम्या :
रत्नागिरी पोस्ट कार्यालय आतून बंद, खिडकीतून दिसलं, महिला पोस्टमास्तरचा गळफास!
एक नवरी, चार उतावळे नवरदेव; चौघेही एकत्र आले अन्…
(NCB Narcotics Control of Bureau arrests Nigerian drug peddler at Navi Mumbai Kharghar)