मुंबई : आयुष्यात कधी संकट येणार हे सांगता येत नाही. मात्र आलेल्या संकटातून बाहेर येऊन पुन्हा जीवनात संघर्ष करणे हे महत्वाचं असतं. असाच प्रकार घडला आहे मिझोरम (Mizoram) येथील माजी ज्युनियर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियन (Junior International Table Tennis Champion) लालरिन पुईया (Lalrin Puia) या खेळाडूसोबत. टेबल टेनिसपटू लालरीन सोबत एक असा प्रसंग घडला की ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्यच बदललं. 2017 मध्ये एक स्पर्धा खेळून भारतात परत येत असताना मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर लालरीनजवळ 3.9 किलो ड्रग्स बाळगल्या प्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून जवळपास साडेचार वर्ष लालरीन नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात होता. मात्र या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयने पुराव्याअभावी महत्त्वाचा निर्णय देत त्याची निर्दोष सुटका करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर मंगळवारी लालरीन याची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.
लालरीन यांनी लहानपणा पासूनच इतर देशांमध्ये भारताचा नाव लोकिक व्हावा असं स्वप्न पाहिलं होतं. त्यानुसार त्याने लहानपणा पासूनच मनात एक जिद्द ठेवून आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक देखील मिळवून दिले आहे. मात्र अटकेच्या घटनेनंतर लालरीनचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आणि त्याला अनेक वर्षे तुरुंगात राहावं लागलं. पण उशिरा का होईना शेवटी न्यायालयाने आपला निर्णय देत त्याची निर्दोष सुटका केली आहे. मात्र या संघर्षात लालरीनसोबत त्याचे कुटुंबीय तर होतेच मात्र मिझोरम स्टेट टेबल टेनिस असोसिएशन आणि इतर लोकही होते ज्यांनी कायदेशीर लढाईत लागलेला जवळपास 17 लाख रुपये इतका खर्च केला.
Mizo Table tennis star- Lalrinpuia who was wrongfully convicted in Mumbai in the year 2017 finally got justice today!
I congratulate and wish the former Indian cadet, sub junior, junior & youth category champion Lalrinpuia to comeback stronger than ever.
At last Justice Triumph pic.twitter.com/ZzilugxX0u
— Robert Romawia Royte (@robertroyte) March 14, 2022
लालरिन पुईया यांनी म्हटल्याप्रमाणे, माझ्या आयुष्यात मागील साडेचार वर्ष जे काही झाले. त्यातून मी आता बाहेर पडलोय. पण आता मला पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहायचे आहे. प्रत्येकाच्या जीवनात अनेक संकटं येत राहतात. मी देखील अशा संकटाा सापडलो होतो. पण जेलमधून सुटका झाल्यानंतर आता मी निराश होऊन बसणार नाही. पुन्हा नवीन जिद्दीने मी जे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एवढंच नव्हे तर भारतासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
Mizo TT Star Lalrinpuia being welcomed by Mizo community after he walks out of Taloja jail.
In Dec2017,then 19yr-old rising star was duped into transporting bag by cartels supplying drugs n was arrested by NCB at Mumbai Airport.The Bombay HC on 14 March acquitted him after 4 yrs. pic.twitter.com/dOzyKl4ruV— miZO zEITGEIST (@mizozeitgeist) March 16, 2022
इतर बातम्या
VIDEO : दारुच्या नशेत भान हरपलं अन् चाकू घेऊन नाचणं जीवावर बेतलं, मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना
Video : ओव्हरटेकच्या नादात लक्झरी बसची फलकासह आजोबांना धडक, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद