नवी दिल्ली: नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत केरळ किनारपट्टीवर उभ्या असलेल्या एका जहाजातून 12,000 कोटी रुपये किमतीचे सुमारे 2,500 किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाकडून सांगण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, देशातील मेथॅम्फेटामाइनची ही सर्वात मोठी कारवाई असून याप्रकरणी एका संशयित पाकिस्तानी व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आले आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नॅशनल कंट्रोल ब्युरोने ‘ऑपरेशन 2022’ सुरू केले आहे. त्यामुळे आता समुद्रमार्गे केले जाणाऱ्या गुन्ह्यांना यामुळे चाप बसणार आहे.
या कारवाईत अफगाणिस्तानातून येणार्या अंमली पदार्थांच्या सागरी तस्करीवर लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एनसीबीचे उपमहासंचालक संजय कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेली जहाजांवर कारवाई करणे आणि त्याची माहिती गोळा करण्यावर आता अधिक भर देण्यात आला आहे.
एनसीबीकडून विविध औषध कायदा अंमलबजावणी संस्था जसे की महसूल गुप्तचर संचालनालयाकडून गुजरातमधील एटीएस आणि भारतीय नौदल आणि एनटीआरओच्या गुप्तचर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
एनसीबीकडून गेल्या दीड वर्षात दक्षिणेकडील मार्गाने अंमली पदार्थांची तस्करी करण्याची ही तिसरी मोठी कारवाई असल्याचेही सांगण्यात आले आहे.
‘ऑपरेशन समुद्रगुप्त’ला पहिले यश हे फेब्रुवारी 2022 मध्ये मिळाले होते. या कारवाईत NCB आणि भारतीय नौदलाने संयुक्त कार्यक्रम राबवून 529 किलो चरस, 221 किलो मेथॅम्फेटामाइन आणि 13 किलो हेरॉईन जप्त केले होते. त्याच वर्षी दुसऱ्या कारवाईत एक इराणी बोट समुद्रकिनारी अडवण्यात आली होती.
तर केरळमध्ये अफगाणिस्तानातून आयात केलेले 200 किलो उच्च दर्जाचे हेरॉईनही जप्त करण्यात आले होते. तर या प्रकरणी 6 इराणी तस्करांनाही पकडण्यात आले होते.