राजस्थान : जयपूरमधील एका सरकारी रुग्णालयात (Government Hospital) 21 दिवसांच्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वॉर्मरच्या ओव्हरहिंटींगमुळे (Over heating of Warmer) तान्ह्या बाळाचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनासह मृत बाळाच्या आईवडिलांनाही मोठा धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर अखेर रुग्णालयाने कर्तव्यावर असलेल्या दोघा नर्सचं निलंबन केलं आहे. तसंच याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती देखील स्थापन केली आहे. राजस्थानच्या (Rajasthan Crime News) भिलवाडा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील NICU मध्ये ही खळबळजनक घटना घडली.
बुधवारी ही दुर्दैवी घटना घडली. महात्मा गांधी सरकारी रुग्णालयातील प्रसूती विभागात ही घटना घडली. यात एका 21 वर्षांच्या चिमुकल्या बाळाचा मृत्यू झाला. तर दुसरं आणखी एक बाळ जखमी असल्याची माहिती मिळतेय.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मृत्यू झालेलं बाळाचं वजन जास्त असल्याच प्रसूतीनंतर समोर आलं होतं. त्यामुळे या बाळावर उपचार सुरु होते. वॉर्मरमध्ये या बाळाला ठेवण्यात आलं होतं. त्यादरम्यान झालेला या कोवळ्या जीवाचा मृत्यू अंगावर शहारे आणणार होता.
नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाचा मृत्यू झाल्याचं कळल्यानंतर चिमुकल्याच्या आईने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. 5 ऑक्टोबर रोजी हे बाळ जन्माला आलं होतं. 21 दिवसांच्या उपचारादरम्यान या बाळाच्या रुग्णालयातील मृत्यूनं सगळेच हादरलेत.
बाळाला मंगळवारी रात्री वॉर्मरमध्ये टेवण्यात आलं होतं. पण बुधवारी पहाटे या बाळाचा मृत्यू झाल्याची समोर आलं. यानंतर मृत बाळाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात आपलाच रोष व्यक्त केला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेतलीय.
बाळाच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं सांगण्यात आलंय. मात्र तूर्तास कर्तव्यावर असलेल्या दोघा नर्सेसचं ताप्तुरत्या स्वरुपात निलंबन करण्यात आल्याचंही रुग्णालय प्रशासनकडून कळवण्यात आलं आहे.