बंगलुरू : महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक राज्यात एका बबलीने चांगलाच धुमाकूळ घातलाय. ही बबली इन्स्टाग्राम, फेसबुकवर आपली सावज शोधते. त्यांच्याशी मैत्री करते. एकदा मैत्री झाली की सावजाला भेटायला बोलावून त्याच्याशी शरीर संबध ठेवते. त्याचे व्हिडीओ काढून सावजाकडे पैशांची मागणी करते. त्याने पैसे दिले नाही तर मुस्लीम धर्म स्वीकारून लग्न करण्यास भाग पाडते. अशा पद्धतीने या बबलीने एकूण ५० जणांना ठकवले आहे. विशेष म्हणजे ही बबली महाराष्ट्रातीलच आहे.
हनी ट्रॅपचा बळी ठरलेल्या एका तरुणाने थेट बंगळूर पोलीस स्टेशन गाठून झाल्या प्रकाराची माहिती दिली. नेहा नावाच्या मुलीसोबत त्याची टेलिग्राम अॅपवर ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात संभाषण होऊ लागले. त्यांची मैत्री वाढली. एके दिवशी नेहाने त्या तरुणाला एका घरी भेटायला बोलावले. तेथे त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले.
नेहा आणि तो तरुण त्या खोलीत कामक्रीडा करत होते. पण, नेहाचे मित्र आधीपासूनच त्या खोलीत लपून बसले होते. त्यांनी त्याचे फोटो काढले, त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर काही दिवसांनी नेहा हिने त्या तरुणाकडे पैशांची मागणी केली. ती त्याला ब्लॅकमेलिंग करू लागली. त्याने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिच्या मित्रांनी तरुणाला धमकी देण्यास सुरवात केली. पैसे दे नाही तर नेहाशी लग्न करून मुस्लीम धर्म स्वीकार अशी धमकी ते मित्र तरुणाला देऊ लागले.
पिडीत तरुणाने बेंगळुरूमधील पुट्टेनहल्ली पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हनी ट्रॅपद्वारे पैसे उकळल्याप्रकरणी कलम ३४८ आणि ४२० अन्वये चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास करत असताना पोलिसांना अधिक धक्कादायक माहिती मिळाली.
पोलिसांनी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन जणांना अटक केली. तर, मुख्य आरोपी नेहा उर्फ मेहर नावाची तरुणी फरार आहे. नेहा ही महाराष्ट्रातील रहिवासी असून तिचे अन्य तीन साथीदार हे कर्नाटकातील आहेत. नेहा आणि तिच्या मित्रांनी आतापर्यंत 50 जणांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या तरुणांनी 35 लाखांहून अधिक रक्कम लुबाडल्याची कबुली दिली. तर तक्रार दाखल केल्या तरुणाकडून त्यांनी ५० हजार रुपये उकळल्याची माहिती दिली. गेल्या दीड वर्षांपासून हे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीकडून 60 हजार रुपये जप्त करण्यात केले आहेत. तर, फरार आरोपी महिला नेहा उर्फ मेहर हीचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, त्यांनी जबरदस्तीने कुणाचे धर्मांतर केले आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.