NIA चा दणका, नवाब मलिकांचा साथीदार सुहेल खांडवानीच्या घरावर छापेमारी

| Updated on: May 09, 2022 | 3:06 PM

माहिम परिसरात सुहेल खांडवानी राहत असून छापेमारी सुरु झाल्यापासून त्याच्या घराच्या परिसरात मोठा सीआरपीएफ बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

NIA चा दणका, नवाब मलिकांचा साथीदार सुहेल खांडवानीच्या घरावर छापेमारी
सुहेल खांडवानीच्या घरावर छापे
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

मुंबई : अंमलबजावणी संचलनलयाच्या अटकेत असलेले महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांचा साथीदार सुहेल खांडवानी (Suhail Khandwani) याच्या घरावर एनआयएने (NIA) छापा टाकला आहे. सुहेल खांडवानी हा मुंबईतील माहिम आणि हाजी अली दर्ग्याचा विश्वस्त आहे. माहिममधील त्याच्या घरी पहाटेपासूनच छापेमारी सुरु आहे. याशिवाय मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित तिघांच्या ठिकाण्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या धाडी सुरु असल्याची माहिती आहे.

पाहा एएनआयचे ट्वीट

कोण आहे सुहेल खांडवानी?

सुहेल खांडवानी हा मुंबईतील माहिम आणि हाजी अली दर्ग्याचा विश्वस्त आहे. माहिममधील त्याच्या घरी पहाटेपासूनच छापेमारी सुरु आहे. याशिवाय मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित तिघांच्या ठिकाण्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या धाडी सुरु असल्याची माहिती आहे.

माहिम परिसरात सुहेल खांडवानी राहत असून छापेमारी सुरु झाल्यापासून त्याच्या घराच्या परिसरात मोठा सीआरपीएफ बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित दोघे जण आणि एका बिल्डरच्या ठिकाण्यावरही ही छापेमारी करण्यात आली.

ठाकरे सरकारमधील मंत्री एनआयएच्या निशाण्यावर?

नवाब मलिक यांची ईडीने चौकशी केली, त्यावेळी ज्याचं नाव समोर आलं होतं, त्या समीर फ्रुटलाही एनआयएने ग्रँट रोड परिसरातून ताब्यात घेतले आहेत. मुंबईतील बाबा फालुदाचे मालिक असलम सरोदिया यांच्या घरीही एनआयएने धाड मारल्याची चर्चा आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री एनआयएच्या निशाण्यावर असल्याची जोरदार चर्चा आहे, त्यामुळे हे मंत्री नेमके कोण, याचा खुलासा अद्याप बाकी आहे.

काय आहे प्रकरण?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज मुंबईतील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे 20 अड्डे दाऊदच्या शार्प शूटर, तस्करांशी संबंधित आहेत. याशिवाय अनेक हवाला ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत.

दाऊद इब्राहिमसाठी हा मोठा दणका मानला जातो. नागपाडा, भेंडी बाजार, मुंब्रा, भिवंडी, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रुझ यासारख्या वीसहून अधिक ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत. एनआयएच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याची माहिती आहे.