मुंबई : बोरिवली पश्चिम येथील एका महिलेला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. एका नायजेरियन नागरिकाने या महिलेला फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून तब्बल साडे दहा लाख रुपयांना गंडविले आहे. या फसवणुकीबाबत पोलिसांनी मूळचा नायजेरियन नागरिक इफिनाई मदुकासी प्रिंस आणि त्याची साथीदार भारतीय महिला हेयो बोलो मेइंग यांना अटक केली आहे. (Nigerian citizen cheated Borivali woman for ten lakh)
मिळालेल्या माहितीनुसार मूळचा नायजेरियाचा इफिनाई मदुकासी प्रिंस हा भारतीय महिला हेयो बोलो मेइंग हिच्या मदतीने महिलांशी फेक अकाऊंद्वारे ऑनलाईन मैत्री करायचा. या महिलांशी सुरुवातीला चांगली मैत्री करुन नंतर त्यांची फसवणूक कारयचा. त्यासाठी या दोघांनी एकूण दहा फेक अकाऊंट चालू केले होते. ऑनलाईन पद्धतीने महिलांची फसवणूक करण्यासाठी नायजेरियन आरोपी आणि भारतीय महिला हेयो बोलो मेइंग ही मुंबई एयरपोर्टवर कस्टम ड्यूटी भरण्याच्या नावाखाली लाखो रूपये आनलाईन पद्धतीने मागायचे. त्यानंतर आनलाईन पैसे मिळाल्यानंतर ते दोघेही तत्काळ संपर्क तोडून देत होते. अशाच प्रकारे बोरिवलीच्या तक्रारदार महिलेची फसवणूक करण्यात आली होती.
बोरिवली येथील महिलेची फवसणूक झाल्यानंतर या महिलेने थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सापळा रचत दिल्लीच्या चंद्र विहार येथून नायजेरियन नागरिक इफिनाई मदुकासी प्रिंस आणि त्याची साथीदार भारतीय महिला हेयो बोलो मेइंग यांना अटक केली. यावेळी या दोघांकडून 16 डेबिट कार्ड, 10 पासबुक, 2 लॅपटॉप, 9 मोबाईल, 4 नवीन सिमकार्ड आणि 2 आंतरराष्ट्रीय सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, या दोघांनी लॉकडाऊनच्या दरम्यान अशा शेकडो महिलांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. या दोघांनी मिळून या काळात कोटींची लूट केल्याचाही पोलिसांना संशय आहे. या दोघांची चौकशी सुरु असल्याचे बोरीवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल कुंभार यांनी सांगितले असून ऑनलाईन पद्धतीने मिळणाऱ्या प्रलोभनांपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
Photo : ‘क्यूटनेस ओव्हरलोडेड’ अशनूरचा दिलकश अंदाजhttps://t.co/B3yvB52Fpa@ashnoorkaur03 #ashnoorkaur
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 13, 2021
इतर बातम्या :
तब्बल 1800 किलो गांजा जप्त, ड्रग्ज तस्करीचा छडा लागण्याची शक्यता
Rinku Sharma Murder | ज्याच्या पत्नीला रिंकू शर्माने रक्त दिलं, त्यानेच जीव घेतला
(Nigerian citizen cheated Borivali woman for ten lakh)