बारामती : पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याच्या नैराश्यातून पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथे घडली आहे. .
रविवारी (24 ऑक्टोबर) पहाटे ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मनोहर संभाजी कुतवळ (वय 35, रा.कुतवळवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुतवळ यांची पत्नी गेले काही दिवसांपासून आजारी होती. पुण्यातील एका रुग्णालयात त्यांच्या पत्नीवर औषधोपचार सुरु होते. रुग्णालयाने पैसे भरण्यास सांगितले होते. मात्र, पैशांची जुळवाजुळव होत नव्हती, त्यामुळे मनोहर तणावात होता. त्यांनी जवळपास साडेचार लाख रुपये जमा करुन रुग्णालयात भरले होते. मात्र अजून रक्कम भरण्याचा निरोप आल्यानंतर पहाटे एका झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे.
बेळगावी जिल्ह्यातील बोरागल गावात राहणाऱ्या 46 वर्षीय व्यक्तीने शनिवारी आपल्या चार मुलांसह त्यांच्या घरी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पत्नीचा ब्लॅक फंगसने मृत्यू झाल्यानंतर पती व्यथित झाला होता. त्यानंतर तीन अल्पवयीनांचा समावेश असलेल्या चार लेकरांसह त्याने सामूहिक आत्महत्या केली.
काय आहे प्रकरण?
पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही जणांचा विष प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाने एकत्रित आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय, याचा पोलीस तपास करत आहेत.
जून महिन्यात गोपाळची पत्नी जया यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काळ्या बुरशीच्या आजाराने त्यांना ग्रासले जून महिन्यात जया हदिमनी यांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंब नैराश्यात होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
गोपाळ हदिमनी (वय 46 वर्ष), त्यांची मोठी मुलगी सौम्या (19 वर्ष) आणि 8 ते 16 वर्ष वयोगटातील तीन लहान भावंडं अशा एकूण पाच जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. आईविना जगण्यात रस नसल्याच्या भावना पोरं सारखी व्यक्त करायची, असं त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं.
आईचा ब्लॅक फंगसने मृत्यू, आठवणींनी व्याकूळ चार लेकरांची पित्यासह आत्महत्या https://t.co/a6GpwRixWU #Crime | #Suicide | #BlackFungus
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2021
संबंधित बातम्या :
लग्नाला दहा वर्षे झाली, दोन मुलं, पण महिलेची टेरेसवरुन उडी, आत्महत्येमागचं नेमकं कारण काय?