भयंकर! कॅन्सर लास्ट स्टेजमध्ये असल्याचं कळताच नवरा-बायकोची गळफास घेत आत्महत्या

| Updated on: May 01, 2022 | 10:26 AM

Couple Suicide : 25 एप्रिलला अरुणचा मेडिकल टेस्ट रिपोर्ट समोर आला. यामध्ये अरुणला कॅन्सर असून तो शेवटच्या स्टेजमध्ये असल्याचं समोर आलं होतं.

भयंकर! कॅन्सर लास्ट स्टेजमध्ये असल्याचं कळताच नवरा-बायकोची गळफास घेत आत्महत्या
धक्कादायक घटना
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : अत्यंत दुःखद आणि काळजाचे तुकडे पाडणारी घटना समोर आलीय. नवी दिल्लीत (New Delhi) एका दाम्पत्यानं आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचा कारण काळीज पिळवटून टाकणारं आहे. तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका नवरा बायकोनं आपली जीवनयात्रा संपवली. दोघांनी पंख्याला लटकून गळफास (Hang Suicide) लावून घेत जीव दिलाय. अवघ्या चार दिवसात या दाम्पत्याच्या आयुष्यात समोर आलेल्या पेचप्रसंगानं हे दोघंही जण पूर्णपणे तुटले आणि त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. नोयडाच्या सेक्टर 22 मध्ये हे दाम्पत्य गुण्या-गोविंदानं राहत होतं. काही दिवसांपूर्वी पतीचा घसा खवखवू लागला होता. म्हणून अखेर मेडिकल टेस्ट करण्यात आली. मोठ्या मेडिकल चाचणीनंतर जे समोर आलं, ते या पत्नी-पत्नीला हादरवणारं होतं. पतीला कॅन्सरची लागण झाली होती. कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये (Cancer Last Stage) असल्याचं मेडिकल रिपोर्टमधून स्पष्ट झालं होतं. हे पाहून पती-पतीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.

अवघ्या चार दिवसात उद्ध्वस्त

29 एप्रिलच्या बरोबर चार दिवस अगोदर मेडिकल रिपोर्टमधून पतीला कॅन्सर झाला असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर अवघ्या काही तासांतच उद्ध्वस्त करणारी घटना उघडकीस आली आहे. अरुण सिंह आणि शशिकला अशी या दाम्पत्याची नावं आहे. ते सेक्टर 22 मध्ये एका भाड्याच्या घरात राहत होते. गेल्या आठ वर्षांपासून अरुण याच ठिकाणी राहत होते. तर तीन वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न झालेलं. दोघांना मूलबाळ नव्हतं. अरुण एका फॅक्टरीमध्ये इंजिनिअर म्हणून नोकरी होता. तर शशिकला घर सांभाळायची.

अनेक दिवसांपासून अरुणचा घसा खवखवत होता. म्हणून अरुणनं मेडिकल टेस्ट करायचं ठरवलं. त्यानंतर 25 एप्रिलला अरुणचा मेडिकल टेस्ट रिपोर्ट समोर आला. यामध्ये अरुणला कॅन्सर असून तो शेवटच्या स्टेजमध्ये असल्याचं समोर आलं होतं. ही गोष्ट कळल्यानंतर अरुण आणि शशिकला पूर्णपणे कोलमडले होते. आता काय करायचं? हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत होता.

अखेर 29 एप्रिल रोजी अरुण आणि शशिकला दोघांनीही पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी घटनास्थळी एक सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली. या सुसाईड नोटमध्ये पोलिसांना त्यांच्या आत्महत्येचं कारण कळलं. कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये असल्यामुळे आम्ही जीव देतोय, असं या पती-पत्नीं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहीलं होतं.

आत्महत्या केल्याच कळलं कसं?

अरुणचे नातलग त्याला वेळोवेळी फोन करत होते. पण फोन काही उचलला गेला नाही. अखेर त्याच्या कामावरही संपर्क करण्यात आला. तेव्हा अरुण काही कामावर आलेला नाही, हे त्यांना कळलं. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस जेव्हा अरुणचा शोध घेण्यासाठी सगळ्यात आधी घरी पोहोचली, तेव्हा अरुण आणि शशिकला यांचं पंख्याला लटकलेले मृतदेह पाहून हादरुनच गेली होती.