भयानक ! कुत्रा भुंकल्यावर तो भडकला, थेट लोखंडी रॉडच…. मालकिणीलाही केली मारहाण

| Updated on: Oct 21, 2023 | 11:43 AM

शेजारी राहणाऱ्या महिलेचा कुत्रा भुंकला म्हणून एक इसम प्रचंड भडकला.रागाच्या भरात त्याने असं काही केलं ज्यामुळे सगळेच हादरले. एवढेच नव्हे तर त्याने त्या कुत्र्याच्या मालकिणीसोबतही गैरवर्तन करत मारहाण केली.

भयानक ! कुत्रा भुंकल्यावर तो भडकला, थेट लोखंडी रॉडच.... मालकिणीलाही केली मारहाण
Image Credit source: social media
Follow us on

भुवनेश्वर | 21 ऑक्टोबर 2023 : अनेकांच्या घरात कुत्रा पाळला जातो. पण काहींना मात्र ते आवडत नाही. कुत्र्याच्या भुंकण्याचा (dog barking) त्रास काहींना होतो. भुवनेश्वरमध्येही एका इसमाला शेजारच्या घरातील कुत्र्याच्या भुंकण्याचा प्रचंड त्रास झाला. मात्र ही बाब शांतपणे सोडवण्याऐवजी त्याने जो मार्ग पत्करला (dispute) त्यामुळे सगळेच हादरले. त्याने त्या कुत्र्याला इजा पोहोचवली (attacked dog and his owner) एवढेच नव्हे तर त्याच्या मालकिणीसोबतही गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेने तो इसम आणि त्याच्या वडिलांवर गंभीर आरोप लावले आहेत. महिलेने सांगितले की, आरोपीने तिचे केस पकडून तिला रस्त्यावर ओढले आणि नंतर तिचे कपडेही फाडले. आरोपीने तिच्या पाळीव कुत्र्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

नक्की काय घडलं ?

हे संपूर्ण प्रकरण ओडिशातील भुवनेश्वरमधील कॅपिटल पोलिस स्टेशनचे आहे. रिपोर्टनुसार, चंदन नायक असे आरोपीचे नाव असून त्याने पाळीव कुत्र्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या संपूर्ण घटनेसंदर्भात महिलेने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. रिपोर्टमध्ये महिलेने आरोपी चंदनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत, तर आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणीही तिने केली आहे.

महिलेने पोलिसांना सांगितल्यानुसार, दुपारच्या सुमारास आरोपी चंदन आणि त्याचे वडील तिच्या घरासमोर आले आणि आरडाओरडा करू लागले. महिलेने दरवाजा उघडताच दोघांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिचा कुत्रा जोरात भुंकत असल्याने त्रास होतोय, त्याला शांत कर असे आरोपीने तिला सांगितले. मात्र त्याच्या उद्धट, अरेरावी गाजवणाऱ्या टोनमुळे महिलेने कुत्र्याला शांत करण्यास नकार दिला. तेव्हा चंदनने तिचे केस पकडून तिला जोरात रस्त्यावर ओढलं आणि तिचे कपडेही फाडले. यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला आणि अत्याचाराचाही प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेत आरोपीच्या वडिलांनी त्याला पुरेपूर साथ दिली.

एवढेच नव्हे तर आरोपीने तिच्या कुत्र्यावर टोकदार रॉडने हल्ला केला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तो रॉड घुसवल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या संपूर्ण प्रकरणी महिलेने गंभीर आरोप केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.