नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एक दुर्देवी घटना घडल्याचं पुन्हा एकदा उजेडात आलं आहे. दीड वर्षाच्या मुलीने तोंडात मच्छर मारण्याची औषधाची बाटली तोंडात घातल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये (Nagpur police station) गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीचा मृतदेहाची (deadbody) आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर नेमकं कारण समजेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी डॉक्टरांशी सुध्दा संपर्क साधला आहे. अचानक हा प्रकार घडल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
नागपूरात मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. नागपूरातील सक्करदरा परिसरातील ही दुर्दैवी घटना घडली आहे. रिद्धी दिनेश चौधरी असे मृत मुलीचे नाव आहे. खेळत असताना रिद्धीच्या हाती मच्छर मारण्याच्या औषधीची बाटली लागली. तिने तोंडात घातल्यामुळे ती बेशुद्ध पडली असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे. तासाभराने तिची आई बेडरुममध्ये आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वडिलांनी रिद्धीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन तासांनंतर मुलीचा मृत्यू झाला. सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती धनंजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सक्करदरा यांनी केली आहे.
लहान मुलांच्यावरती खेळताना किंवा ती मुलं मोठी होईपर्यंत अधिक लक्ष द्यावं लागतं. कारण खेळताना मुलं माहित नसलेल्या वस्तूसोबत सुध्दा खेळतात. नागपूरच्या घटनेत चिमुकलीच्या हाती मच्छर मारण्याची बाटली लागली. तिने ती तोंडात घातली, त्यानंतर ती बेशुध्द होऊन मरण पावली. दोन तासात मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मागच्या काही दिवसांपासून क्राईमच्या रोज घटना नागपूरात उजेडात येत आहेत. पण कालच्या घटनेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर मुलांची काळजी घेण्याचं पोलिसांनी आवाहन केलं आहे.