आधी ट्रकचालकाला उडवले, नंतर स्कुटीला धडक, नवी मुंबईत मध्यरात्री थरार, भीषण अपघातात एक ठार

| Updated on: Nov 24, 2023 | 11:09 AM

नवी मुंबई | 24नोव्हेंबर 2023 : राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून आता नवी मुंबईत एक भीषण आणि दुर्दैवी अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील उलवे येथे एक कार आणि ट्रकची भीषण धडक होऊन झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, […]

आधी ट्रकचालकाला उडवले, नंतर स्कुटीला धडक, नवी मुंबईत मध्यरात्री थरार, भीषण अपघातात एक ठार
Image Credit source: ANI
Follow us on

नवी मुंबई | 24नोव्हेंबर 2023 : राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून आता नवी मुंबईत एक भीषण आणि दुर्दैवी अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील उलवे येथे एक कार आणि ट्रकची भीषण धडक होऊन झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्रीच्या सुमारा उलवे जवळ हा अपघात झाला. एक कार उलवे येथून बेलापूरच्या दिशेने जात असतानाच कारचा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती कार समोर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. त्यावेळी ट्रक चालक खाली उतरला होता. ही धडक एवढी भीषण होती की ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानतंर ती कार पुढे जाऊन एका स्कूटीवरही जाऊन धडकली. या अपघातात ट्रक चाक मृत्यूमुखी पडला तर स्कुटीचालक आणि कार चालक दोघेही गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेत त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. या घटनेत कारचा संपूर्ण चक्काचूर झाला आहे. नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते अधिक तपास करत आहेत.

 

नाशिकजवळ आयशर टेम्पो आणि रातराणी एसटी बसचा अपघात, 5 जखमी

दरम्यान नाशिकजवळील निफाड येथेही एक अपघात झाला आहे. नाशिक-छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर पहाटेच्या दरम्यान आयशर टेम्पो आणि रातराणी एसटी बसची धडक होऊ अपघात झाला. निफाड जवळील आचोळे नाल्याजवळ नाशिकच्या दिशेने जाताना हा अपघात झाला असून त्यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यावेळी बसमध्ये एकूण 65 प्रवासी होते. या अपघातामध्ये एसटी बस आणि आयशर टेम्पोसह मालाचे मोठे नुकसान झाले.

( डिस्क्लेमर : ही बातमी अपडेट होत आहे.)