ट्रेनमध्ये जागेवरुन भांडण, प्रवाशाने दुसऱ्या स्थानकावर साथीदाराना बोलून केला हल्ला, एकाचा मृत्यू

| Updated on: Feb 04, 2025 | 9:51 PM

ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा दिली नाही म्हणून एका गटाने दुसऱ्या गटाला साथीदारांना बोलावून हल्ला केल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचा एक साथीदार जखमी झाला आहे.

ट्रेनमध्ये जागेवरुन भांडण, प्रवाशाने दुसऱ्या स्थानकावर साथीदाराना बोलून केला हल्ला, एकाचा मृत्यू
Follow us on

ट्रेनमध्ये बसण्याच्या जागेवरुन प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणातून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबई उपनगरीय लोकलमध्ये घडला नसून महाराष्ट्रात नंदूरबार रेल्वे स्थानकादरम्यान घडला आहे. नंदूरबार रेल्वे स्थानकादरम्यान बसण्याच्या जागेवरुन दोन प्रवाशात भांडण झाले. त्यानंतर वाद वाढत गेला. त्यानंतर दोघापैकी एका प्रवाशाने आपल्या साथीदारांना पुढील स्थानकावर बोलावून घेतले यात २६ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राच्या नंदूरबार रेल्वे स्थानकादरम्यान एक्सप्रेस ट्रेनमध्ये दोघा प्रवाशांमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर एका गटाने आपल्या अन्य साथीदारांना बोलावून जबरमारहाण केल्याने २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी चेन्नई- जोधपूर एक्सप्रेसमध्ये झालेल्या या हल्ल्याप्रकरणात एका प्रवाशाला अटक झाली आहे तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

पीडीत सुमरे सिंह आणि परबत परिहार ( ४० ) हे चेन्नईहून ट्रेनमध्ये बसून आले होते आणि त्यांना जोधपूर येथे आपल्या घरी चालले होते. जेव्हा ट्रेन भुसावळ येथे पोहोचली दोघांचा सीटवरुन एका प्रवाशाशी भांडण झाले. त्या प्रवाशाने आपल्या काही साथीदारांना नंतर नंदूरबार स्थानकात बोलावले.

हे सुद्धा वाचा

प्रवाशाच्या मित्रांचा धारदार शस्रांनी हल्ला

ट्रेन जेव्हा नंदूरबार येथे पोहोचली तेव्हा प्रवाशाच्या साथीदारांनी दोघांवर धारदार हत्यारांनी हल्ला केला, त्यामुळे ते प्रचंड जखमी झाले,त्यानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले.परंतू तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी पहाटे सुमरे सिंह याचा मृत्यू झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरु आहे.