पश्चिम बंगाल : मेदिनीपूर जिल्ह्यात बॉम्ब हल्ल्यात TMC च्या कार्यकर्त्याचा मृत्यू, दोघे गंभीर

| Updated on: Feb 24, 2021 | 7:33 AM

पश्चिम बंगालच्या पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री बाईक (One TMC Worker Killed And Two Injured) स्वार हल्लेखोरांनी बॉम्ब आणि गोळीबार केला.

पश्चिम बंगाल : मेदिनीपूर जिल्ह्यात बॉम्ब हल्ल्यात TMC च्या कार्यकर्त्याचा मृत्यू, दोघे गंभीर
One TMC Worker Killed And Two Injured
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालच्या पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री बाईक (One TMC Worker Killed And Two Injured) स्वार हल्लेखोरांनी बॉम्ब आणि गोळीबार केला. यामध्ये राज्यात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन जण जखमी झाले आहेत (One TMC Worker Killed And Two Injured).

नारायणगड पोलीस ठाण्याअंतर्गत अभिरामपूर गावात शौभिक दोलुई आणि तृणमूल काँग्रेसच्या इतर दोन कार्यकर्ते बसलेले होते, तेव्हाच जवळपास रात्री नऊ वाजता तीन व्यक्ती मोटरसायकलवर आले आणि त्यांच्याकडे बॉम्ब फेकला.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढण्यापूर्वी 24 वर्षांच्या दोलुईंवर गोळीबारीही केला. त्या तिघांना खडगपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी दोलुई यांना मृत घोषित केलं. तर इतर दोन व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. त्यांना मेदिनीपूर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात ट्रान्सफर करण्यात आले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. पण, भाजपच्या जिल्हा अध्यक्षा समित दास यांनी दावा केला की हे तृणमूल काँग्रेसच्या आंतरिक वादाचा परिणाम आहे. राज्यात एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

रविवारी पश्चिम बंगालमध्ये वाढत्या राजकीय तापमानादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की त्या घाबरणार नाही आणि त्यांना तुरुंग किंवा कुठल्याही दुसऱ्या गोष्टीने घाबरवलं जाऊ शकत नाही (One TMC Worker Killed And Two Injured).

त्यांनी सांगितलं, आमची मातृभाषा बांग्लाने आम्हाला वाघाप्रमाणे लढायला शिकवले. त्या उंदरांना घाबरत नाही. कुठल्याही व्यक्तीचं कुठल्या राजकीय पक्षाचा नाव न घेता ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की त्या कधीही पराजित होणे शिकल्या नाहीत. त्याशिवाय, आम्हाला तुरुंगाची भीती दाखवू नका.

One TMC Worker Killed And Two Injured

संबंधित बातम्या :

खासदार मोहन डेलकर यांच्या 15 पानांच्या सुसाईड नोटमधून अनेक गौप्यस्फोट

खासदार मोहन डेलकर आत्महत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये चकीत करणारी माहिती