Cyber Crime : सायबर पोलिसांकडून (Cyber Police) वेळोवेळी जणजागृती करूनही आणि ऑनलाईन फसवणुकीच्या (Online scam) घटना घडत असतांनाही अनेक नागरिकांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक धक्कादायक ऑनलाईन लुटीची घटना समोर आली आहे. एका तरुणाला एक लाख 58 हजार रुपयांना एका भामट्याने गंडा घातला आहे. ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून दामदुप्पट योजनेचं आमिष दाखवून दीड लाख रुपयांना गंडा घातला आहे. तरुणांच्या तक्रारीवरुण अंबड पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको येथील विवेक ओमप्रकाश सिंग असे तरुणाचे नाव आहे.
नाशिकच्या सिडको येथील मोरवाडी येथे राहणाऱ्या विवेक ओमप्रकाश सिंग या तरुणांची जवळपास दीड लाखाची फसवणूक झाली आहे.
अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार विवेक याने गो ॲन्ड शॉप लाइफ या लिंकवर त्याने क्लिक केले. त्यानंतर त्याने अकाऊंट रजिस्टर केले होते.
विवेक याने याने गो ॲन्ड शॉप लाइफ या ॲपवर आयडी आणि पासवर्ड मिळवला होता. त्यात त्याला गोशॉप ६६ असा कस्टमर केअर टेलिग्राम आयडी मिळाला होता.
ऑनलाइन भामट्याने विवेकची माहिती मिळाल्याने त्याने विवेकशी संपर्क साधला, त्यावेळी ॲपची माहिती दिली आणि त्यासाठीच्या एकूण ३० स्टेप्स करण्यास सांगितल्या होत्या.
त्यामध्ये भरलेले पैसे हे स्टेपप्रमाणे दुप्पट होत जातील आणि त्यावर मिळणारे कमिशन ॲपच्या वॉलेटमध्ये जमा होईल असा विश्वास दिला, त्यावर विवेक याने विश्वास ठेवला.
त्यानुसार विवेक याने एक एक स्टेपपुढे जात असतांना त्याच्याकडे अकाऊंटवर असलेले सर्व पैसे हे भरून टाकले, त्यात त्याने गुगल पे आणि फोन पेचा वापर केला होता.
त्यात त्याने 1 लाख 58 हजार रुपये भरले होते, त्यानुसार त्याने बँकेतील पैसे कमी झाल्याचे लक्षात आले, कमिशन देखील न मिळाल्याचे लक्षात आले.
त्यानुसार त्याला ज्या व्यक्तीने कॉल केला त्याच्याशी विवेक संपर्क केला, त्यावेळी त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली, त्यात पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने पोलिसांत धाव घेतली.
विवेकने दिलेल्या तक्रारीवरुन अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीसांच्या मदतीने अंबड पोलीस तपास करीत आहे.