मुंबई – सध्याच्या काळात ऑनलाईन (Online) खरेदीवर तरुणाईचा अधिक भर आहे. तसेच प्रत्येक सणाला घरण्यांना किंवा स्वत:ला ऑनलाईन कपडे किंवा अन्य वस्तू अधिक खरेदी केल्या जातात. देशात अनेक ठिकाणी ऑनलाईन खरेदी करत असताना फसवणूक केल्याची विविध प्रकरणं उघडकीस येत आहेत. तरी सुद्धा लोकांची खरेदीला अधिक पसंती आहे. मुंबईत (Mumbai) अनेक दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. मुंबईतील एका महिलेला ऑनलाइन व्हिस्की ऑर्डर करणे खूप महागात पडले आहे. 550 रुपयांच्या व्हिस्कीच्या (whiskey) बाटलीसाठी सायबर हॅकरने महिलेची 5 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली.
10 ऑगस्ट रोजी बोरिवली येथील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. केक डेकोरेशनसाठी व्हिस्कीची बाटली हवी असल्याचे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले. 9 ऑगस्ट रोजी दहिसर येथील सिल्व्हर वाईन शॉपचा फोन नंबर शोधला. फिर्यादीकडे सायबर हॅकरने अपलोड केलेला दुकानाचा बनावट मोबाईल क्रमांक सापडला. नंबर डायल केल्यावर, फसवणूक करणार्याने दुकानातील कर्मचारी असल्याचे सांगितले सध्या दुकान बंद आहे. परंतु ते 10 मिनिटांत होम डिलिव्हरी करू शकतो अशी माहिती दिली. त्यानंतर अनेक गोष्टी सांगून नोंदणी करायला पाहिजे. तसेच इतर गोष्टीची जाणकारी घेतली. ज्यावेळी महिलेला शंका आली त्यावेळी त्यांच्या खात्यातून 19051 रुपये कापण्यात आले.
फसवणूक करणार्याने पुन्हा महिलेला सांगितले की, तो तिची पूर्ण रक्कम परत करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु पुन्हा काही तांत्रिक बिघाड झाला आहे. यावेळी त्याने महिलेच्या डेबिट कार्डचे तपशील मागितले तेव्हा त्याने तिला कार्डसाठी रकमेची मर्यादा वाढवण्यास सांगितले. त्यामुळे, त्यानंतर फसवणूक करणाऱ्याने त्याच्या डेबिट कार्डची माहिती वापरून सुमारे २ लाख रुपये काढून घेतले. पूर्ण रक्कम परत करण्यासाठी हॅकरने त्यांची फसवणूक करून आणखी दोन लाख रुपये जमा केले. एकूण तीन तासांत महिलेचे 5.35 लाख रुपयांचे नुकसान झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.