पेशावर : पाकिस्तानातील (Pakistan) पेशावर (Peshawar blast) येथील मशिदीत मोठा स्फोट झाला आहे. ज्यामध्ये जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. लेडी रीडिंग रुग्णालयात 30 मृतदेह (Deaths In bomb blast) आणण्यात आल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही घटना कोचा रिसालदार परिसरात घडली आहे. पेशावरचे सीसीपीओ इजाज अहसान यांनी सांगितले की, स्फोटात एका पोलिसाचाही मृत्यू झाला आहे. लेडी रीडिंग रुग्णालयाचे मीडिया मॅनेजर असीम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 30 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. पाकिस्तानात याआधीही असे अनेक हल्ले झाले आहेत. पुन्हा एकदा झालेल्या या स्फोटाने पाकिस्तान पुन्हा हादरून गेला आहे. या हल्ल्यामागे कोण आहे. हे मात्र अद्याप समजू शकले नाही.
स्फोटानंतरचे व्हिडिओ
At least 30 killed and over 50 injured in blast at a mosque during Friday prayers in Peshawar, #Pakistan. pic.twitter.com/JIcOrswPGR
— Ahmer Khan (@ahmermkhan) March 4, 2022
قصہ خوانی بازار کے کوچہ رسالدار شیعہ جامع مسجد میں دو حملہ آور نے گھسنے کی کوشش کی
ڈیوٹی پر موجود پولیس اہلکاروں پر فائرنگ ہوئی ہے
فائرنگ سے ایک پولیس جوان شہید جبکہ دوسرا زخمی ہوا ہے جس کی حالت تشویشناک ہے
پولیس ٹیم پر حملہ کے بعد جامع مسجد میں دھماکہ ہوا ہے
1/2 pic.twitter.com/9gwfHSsPuG
— Capital City Police Peshawar (@PeshawarCCPO) March 4, 2022
आधी पोलिसांवर गोळीबार, पुन्हा स्फोट
सीसीपीओने सांगितले की प्राथमिक अहवालानुसार दोन हल्लेखोरांनी शहरातील किस्सा ख्वानी मार्केटमधील मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि तेथे पहारा देत असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. ज्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा गंभीर जखमी आहे. हल्ल्यानंतर मशिदीत लोकांना टार्गेट करण्यात आले आणि मोठा स्फोट झाला. या घटनेने पाकिस्तान पुन्हा मोठ्या दहशतीच्या सावटाखाली गेला आहे.
कुणीही जबाबदारी घेतली नाही
पोलीस अधिकारी वाहिद खान यांनी एपीला सांगितले की, कोचा रिसालदार मशिदीत नमाज अदा करण्यासाठी लोक जमले असताना हा स्फोट झाला. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. प्रत्यक्षदर्शींपैकी एक शायन हैदर हा देखील मशिदीत प्रवेश करत असताना मोठा स्फोट झाला. त्यामुळे तो रस्त्यावर पडला. या स्फोटाने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
Russia Ukraine War : पुतीन यांची हत्या केली पाहिजे, अमेरिकन सिनेटरच्या वक्तव्याने खळबळ
रक्तरंजीत युक्रेन, युद्धाच्या भयाण जखमा, हजारोंचं भरल्या उरानं स्थलांतर