पालघर : पालघरमध्ये (Palghar Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पर्यटकाला वाचवण्यासाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पर्यटक बुडत असल्याचे पाहून कर्मचाऱ्याने उडी मारली. त्याचा वाचवण्याच्या नादात सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. जव्हार मधील दाभोसा धबधबा (dabhosa waterfall) येथे ही दुर्घटना घडली आहे. देवेंद्र शिंदे (devendra shinde) असं त्या सरकारी कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलिस प्रशासन आणि रेस्क्यू पथक तिथं दाखल होतं. शिंदे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात गटारी साजरी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अधिक घटना या धबधब्याजवळ घडल्या आहेत.
पालघरमधील जव्हार मधील दाभोसा धबधबा येथे एका बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवण्यासाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून देवेंद्र शिंदे असं या लिपिकाच नाव आहे .
शिंदे हे जव्हार पंचायत समितीत कनिष्ठ सहाय्यक लिपिक म्हणून कार्यरत होते. काल आपल्या मित्रांसोबत जव्हार मधील दाभोसा धबधबा येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी एक पर्यटक बुडत असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यानंतर आपल्या जीवाची परवा न करता त्यांनी या पर्यटकाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली.
मात्र वाचवण्यासाठी गेलेल्या लिपिक देवेंद्र शिंदे यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
तीनशे फुटांपेक्षा जास्त उंचीवरून कोसळणाऱ्या दाभोसा धबधब्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत होते. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना किंवा सूचनाफलक लावण्यात आले नसल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं आहे.