Video : पैसे चोरायला बारमध्ये गेला, पैशांसोबतच दारुही सोबत घेऊन आला! परभणीतील चोरीचा व्हिडीओ व्हायरल बघाच

| Updated on: Aug 08, 2022 | 10:33 AM

Parbhani CCTV Video : ही घटना घडली आहे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड शहरामध्ये. गंगाखेड शहरात असलेल्या रचिका बारमध्ये या पठ्ठ्याने चोरी केली.

Video : पैसे चोरायला बारमध्ये गेला, पैशांसोबतच दारुही सोबत घेऊन आला! परभणीतील चोरीचा व्हिडीओ व्हायरल बघाच
परभणीतील चोरी सीसीटीव्ही कैद...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

परभणी : बारमध्ये पैशांची चोरी करायला गेलेल्या चोराना पैसे तर चोरलेत. पण पैसे चोरुन निघताना दिसलेल्या दारुच्या ब्रॅन्डेड (Branded liquor) बाटल्यांही सोबत नेण्याचा मोह काही चोराला आवरता आला नाही. अखेर चोराने बारमधील पैशांसह दारुच्या बाटल्यांवरही हात साफ केला. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली असून हा व्हिडीओ आता संपूर्ण परभणीत व्हायरल झाला आहे. परभणीतल्या (Parbhani Crime News) व्हॉट्सअपग्रूप्समध्ये या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. चोरीच्या उद्देशाने बारमधील गल्ल्यावर डल्ला मारल्यानंतर चोराने दारुच्या बाटल्याही लांबवल्याची चर्चा परभणीत रंगली आहे. बारमध्ये चोराने केलेली चारी आणि सीसीटीव्हीमधला त्याचा वावर यावरुन आता चोरट्याला पकडण्याचं आव्हानंही पोलिसांसमोर उभं ठाकलंय. चोराने चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असल्यामुळे त्याचा चेहरा झाकला गेलाय. त्यामुळे चोरी करणाऱ्याची ओळख पटू शकलेली नाही. पण टेबलावर चढून दारुच्या बाटल्या काढणारा चोर परभणीचं चर्चेचा विषय ठरतोय.

‘शौख बडी चीज है जनाब’ असं म्हणतात. तेच या चोराच्या बाबतीतही झालं. दारुचा शौक तर त्याला होताच. पण मूळ उद्देश पैसे चोरण्याचा होता. बारमध्ये असलेले 19 हजार आधी चोराले लुटले. गल्लावर डल्ला मारला. त्यानंतर बारच्या काऊंटवरील टेबलावर चढून महागड्या दारुच्या बाटल्याही त्यांने खाली काढल्या. यानंतर सराईतपणे हा चोरटा बारमधून निघून घेल्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

पाहा व्हिडीओ: परभणीतील बारमध्ये चोरी कॅमेऱ्यात कैद

हे सुद्धा वाचा

ही घटना घडली आहे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड शहरामध्ये. गंगाखेड शहरात असलेल्या रचिका बारमध्ये या पठ्ठ्याने चोरी केली. चार ऑगस्टला ही चोरी झाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास हा चोरटा बारमध्ये शिरला आणि त्यानं बारमधील रोख रकमेसह दारुवरही हात साफ केला.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरीही ही घटना कैद झाली असली तरी या व्हिडीओमध्ये चोराची ओळख पटू शकलेली नाही. चोराने ला रंगाचा कपडा बांधलेला असल्यामुळे चोराला पकडण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलं. मात्र तूर्तास तरी चोराची तुफान चर्चा व्हायरल सीसीटीव्ही व्हिडीओमुळे रंगलीय.