पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात घरफोड्या करुन धुमाकूळ घालणाऱ्या 14-12 के आर गॅंगच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 14-12 के आर गॅंग कर्नाटक राज्यात पळून जाण्याचा प्रयत्नात होती. त्यावेळी पोलिसांनी के आर गॅंगला अटक केली आहे. (Pimpri Chinchwad 14 12 K R thief Gang arrested by police)
के आर गँगचा म्होरक्या किरण राठोड तसेच के आर गॅंगचे सदस्य भगतसिंग भादा, करण राठोड आणि अभिषेक नलावडे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. किरण राठोडने आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून स्वतःच्या टोळीला के आर गॅंग असं नाव दिलं होतं. तसेच पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात आपल्या गँगची दहशत निर्माण व्हावी म्हणून के आर गँगने स्वतःच्या गॅंगला पिंपरी चिंचवडचा RTO पासिंग नंबर 14-12 के आर गॅंग असं नाव दिलं.
के आर गॅंग कडून भोसरी पोलिसांनी 9 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून, 80 ग्रॅम सोन्याचे दागिने, 11 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 4 लाख 29 हजार 125 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.