पिंपरी चिंचवडमध्ये हत्येचा एक अजब गुन्हा समोर आला आहे, ज्यामुळे पोलिसही हैराण आहेत. एक तरूणाने आत्महत्या केली मात्र त्याच्या कारणाचा तपास करत असतानाच ती आत्महत्या नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले. वकड परिसरात ही घटना घडली. मद्यधुंद तरूणीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरूणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. निकेत कुणाल असं मृत तरूणाचं नाव असून याप्रकरणी आरोपी लोकेंद्र किशोर सिंह ला अटक करण्यात आली आहे.
निकेतने मद्यधुंद असलेल्या मैत्रिणीचा गैरफायदा घेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याची माहिती पीडित तरुणीने तिचा मानलेला भाऊ लोकेंद्रला दिली. लोकेंद्र आणि निकेत कुणाल यांच्यात जबर भांडण झालं आणि रागाच्या भरात लोकेंद्रने निकेत कुणाला विटेने मारहाण केली. त्याचं डोकंही भिंतीवर आदळलं. त्यानंतर निकेत कुणालने स्वत:चं आयुष्य संपवलं. मात्र तपासात वेगळाच प्रकार समोर आल्याने पोलिसही हैराण झाले.
काय घडलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी ही आरोपी लोकेंद्र किशोर सिंहला भाऊ मानते. ती तरूणी, लोकंद्र आणि मृत निकेत हे तिघेही मित्र होते. निकेत कुणाल आणि पीडित तरुणी हे एका कंपनीत काम करत होते. ३ एप्रिल रोजी कंपनीची पार्टी असल्याने निकेत आणि पीडित तरुणी एकत्र आले होते. दोघांनी त्या पार्टीमध्ये मद्यपान केले. ती तरूणी मद्यधुंद अवस्थेत होती, तिने निकेतला फ्लॅटवर सोडण्यास सांगितलं. मात्र तो तिला स्वत:च्या फ्लॅ
वर घेऊन गेला आणि तिच्या अवस्थेचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
दुसऱ्या दिवशी पीडित तरुणीला हे समजताच ती निकेतशी भांडली. नंतर घरी आल्यावर तिने या प्रकाराची माहिती तिचा मानलेला भाऊ लोकेंद्रला दिली. लोकेंद्र आणि पीडित तरूणी हे निकेतच्या घरी गेले, तेथे लोकेंद्र आणि निकेतचं मोठं भांडण झालं. लोकेंद्रने निकेत कुणालच्या डोक्यात विटेने मारहाण केली. त्याचबरोबर त्याचं डोकं भिंतीवर आदळलं. तिथून लोकेंद्र निघून गेला. गंभीर जखमी झालेला निकेत कुणाल खासगी रुग्णालयात गेला, त्या ठिकाणी उपचार घेऊन परत घरी आला.
निकेत हा एका फ्लॅटमध्ये त्याच्या मित्रासह रहात होता. मैत्रिणीचा गैरफायदा घेतला, ती आपल्याविरोधात गुन्हा दाखल करेल, बदनामी होईल या भीतीने निकेतने गळफास लावून आयुष्य संपवलं. त्याच्या मित्राला हे समजताच तो त्याला रुग्णालयात घेऊन गेला मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आधी गळफास घेऊन निकेत कुणालने आत्महत्या केली, असा संशय हिंजवडी पोलिसांना होता. तशी नोंदही पोलिसांनी केली. परंतु, पोस्टमार्टम केल्यानंतर निकेत कुणालचा मृत्यू हा डोक्यात गंभीर इजा झाला असं निष्पन्न झालं. पोलिसांनी कसून तपास करत आरोपी लोकेंद्र सिंहला अटक केली