लखनऊ : उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊच्या (Lucknow) कैसरबागच्या बंगाली टोलामध्ये वृद्ध मालकिणीचा चावा गेऊन जीव घेणारा पिटबुल जातीचा कुत्रा ब्राउनी (Pitbull Case) आता ट्रेनरपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. सोमवारी दिवसभर पिटबुलच्या कोठडीवरून युक्तीवाद सुरू होता. पिटबुलचे मालक जिम ट्रेनर अमित त्रिपाठी सकाळी पालिका कार्यालयात पोहोचले असता त्यांना प्रतिज्ञापत्र देऊन त्याला ताब्यात घेण्यासाठी आले. यानंतर इतर अनेक पिटबुल प्रेमी देखील त्याला ताब्यात घेण्यास इच्छुक असल्याचे दिसून आले. नंतर अमितच्या ताब्यात महापालिकेने पिटबुलला दिले आणि तो त्याला श्वान प्रशिक्षकाकडे घेऊन गेला. जर प्रशिक्षकाचे प्रशिक्षण आणि त्या कुत्र्यांची वागणूक सर्व काही ठीक असेल तरच ब्राउनीला त्याचा मालक अमितकडे परत जाण्याची परवानगी दिली जाईल.
आपल्या आईच्या निधनाने दु:खी झालेले अमित त्रिपाठी म्हणाले, या संपूर्ण घटनेत ब्राउनीला दोषी मानता येणार नाही. प्राणी कधीकधी नियंत्रण गमावतात.त्यामुळे आपण त्यांना सोडू शकत नाही. तसेच आता कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही आमचा कुत्रा महापालिकेतून ट्रेनरकडे नेला आहे. तेथून प्रमाणपत्र मिळेल, त्याआधारे पिटबुलबाबत पुढचे निर्णय घेतले जातील. कुत्र्याला घरी आणाल का? या प्रश्नावर अमित म्हणाले की मी त्याला नक्कीच घरी आणणार. आता आमची आई राहिली नाही, मात्र कुत्र्याला याची शिक्षा कशी देणार? जेव्हा त्याचे प्रशिक्षण संपले आणि कुत्र्याचे वर्तन सामान्य असल्याचे आढळले, तेव्हा त्याला घरात ठेवण्यास काय हरकत आहे? असा सवालही त्याच्या मालकाने केला आहे.
आपल्या मालकिणीचा जीव घेणाऱ्या पिटबुल ब्राउनीला महापालिकेच्या वतीने एबीजे सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तेथे त्याच्या वर्तनावर 14 दिवस नजर ठेवण्यात आली होती. या काळात तो काही गंभीर हलचाली करताना दिसला नाही. मात्र पिटबुलला श्वान प्रशिक्षकाकडेच सोपवले जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. या स्थितीत कुत्रा परत देऊ नका असे मालकाला सांगण्यात आले. त्यामुळेच आता त्याची रवानगी ही ट्रेनरकडे करण्यात आली आहे. आपण प्राण्यांना आपल्या मुलाप्रमाणे जीव लावतो. मात्र योग्य ती काळजी न घतल्यास आणि अचानक पाळीव प्राणीच हिंसक झाल्यास किती महागात पडू शकतं, हेही या चर्चेतल्या केसने दाखवून दिलं आहे.