सख्खे भाऊ, पक्के चोर ! शहरात सख्या भावांचा धूमाकूळ, बाईकवरून यायचे अन्…

| Updated on: Mar 08, 2024 | 9:29 AM

पुण्याची ओळख आता गुन्ह्यांचं शहर म्हणून व्हायला लागली आहे की काय, अशी धास्ती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांत पुण्यात गुन्ह्याच्या एवढ्या विविध घटना घडल्या आहेत की त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्येही घडली आहे. तेथे दोन सख्ख्या भावांनीच धूमाकूळ घालत नागरिकांना नकोसं करून सोडलं आहे.

सख्खे भाऊ, पक्के चोर !  शहरात सख्या भावांचा धूमाकूळ, बाईकवरून यायचे अन्...
Follow us on

पिंपरी चिंचवड | 8 मार्च 2024 : पुण्याची ओळख आता गुन्ह्यांचं शहर म्हणून व्हायला लागली आहे की काय, अशी धास्ती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांत पुण्यात गुन्ह्याच्या एवढ्या विविध घटना घडल्या आहेत की त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्येही घडली आहे. तेथे दोन सख्ख्या भावांनीच धूमाकूळ घालत नागरिकांना नकोसं करून सोडलं आहे.

हे दोन्ही भाऊ महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढायचे. याप्रकरण बऱ्याच लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अखेर पोलिसांनी सापळा रचत त्यांना बेड्या ठोकल्या. अक्षय राजू शेरावत,अजय राजू शेरावत अशी सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या या दोन्ही आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 8 तोळे 300 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शेरावत आणि अजय शेरावत हे दोघे सख्खे भाऊ असून चोऱ्यामाऱ्या करून उदरनिर्वाह करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये धूमाकूळ घातला होता. ते बाईकवरून यायचे आणि रस्त्यावरील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र वगैरे हिसकावून वेगाने फरार व्हायचे. बोऱ्हाडेवाडी मोशी येथेही त्यांनी एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेत असताना घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैदही झाली होती.याप्रकरणी फिर्यादी महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली आणि त्याआधारे त्यांचा शोध घेऊन दोघांनाही बेड्या ठोकल्या. तपासात ते दोघेही सख्खे भाऊ असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 8 तोळे 300 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले.