आर्यन मॅन हार्दिक पाटीलच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात, 9 महिने पोलिसांना दिला गुंगारा

| Updated on: Feb 13, 2022 | 2:20 PM

हार्दिक पाटील हे जागतिक पातळीवरील आर्यमॅन म्हणून त्यांनी मान मिळविला आहे. आत्तापर्यंत त्यांनी 11 फुल आणि 16 हाफ आर्यमॅन स्पर्धा जिंकल्या आहेत.

आर्यन मॅन हार्दिक पाटीलच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात, 9 महिने पोलिसांना दिला गुंगारा
Follow us on

विरार – जागतिक कीर्तीच्या आर्यन मॅन (iron man)असलेल्या विरार (virar) येथील हार्दिक पाटील (hardik patil) याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा कट रचणारा मुख्य आरोपी अटक नुकताच गडाआड केला आहे. त्याचं नाव राज वसंत पाटील (raj vasant patil) असून तो या प्रकरणातला मुख्य आरोपी असल्याचे विरार पोलिसांनी सांगितले. तो मागील नऊ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. विरार पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. अटक आरोपीला वसई न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी हा विरार परिसरातील बांधकाम व्यवसायिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अजून दोघेजण फरारी असून त्याचा देखील शोध पोलिस घेत आहेत. राज वसंत पाटील याने कट रचल्याचा आरोप हार्दिक पाटील यांनी केला होता. त्यामुळे पोलिस अनेक दिवसांपासून आरोपीचा शोध घेत होती. वैयक्तीक कारणामुळे आरोपीने हल्ला केला असल्याचा आरोप हार्दिक पाटील याने केला आहे.

या कारणामुळे केला हल्ला

आत्तापर्यंत आपण विरारमध्ये अनेक घटना घडल्याचे आपण पाहिले आहे परंतु जागतिक कीर्तीच्या आर्यन मॅन (iron man)असलेल्या विरार (virar) येथील हार्दिक पाटील (hardik patil) याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब झाल्याने अनेकांना धक्का बसला होता. पोलिसांनी हल्ल्याचा कट रचना-या मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू असल्याचे समजते आहे. वैयक्तिक कारणामुळे हल्ला केल्याचं पोलिसांनी कारण पुढे आलं आहे. तसेच या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 5 मे 2021 रोजी हार्दिक पाटील यांच्या घरावर पेट्रोलबॉम्बचा केला होता हल्ला. या प्रकरणात 9 जणांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यातले 6 जण पोलिसांच्या ताब्यात असून अन्य 2 जण फरार आहेत.

इतक्या स्पर्धा जिंकल्या

हार्दिक पाटील हे जागतिक पातळीवरील आर्यमॅन म्हणून त्यांनी मान मिळविला आहे. आत्तापर्यंत त्यांनी 11 फुल आणि 16 हाफ आर्यमॅन स्पर्धा जिंकल्या आहेत. हार्दिक पाटील यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची आर्यमॅन म्हणून नोंद झालेली आहे. विरार पश्चिम डोंगरपाडा परिसरातील वर्तकवाडी या परिसरात हार्दिक पाटील यांचे घर आहे.

Reaction : कंगनाच्या निशाण्यावर आता दीपिका पादुकोण, म्हणाली कचरा विकू नकोस…, वाचा नेमका वाद काय?

सोमय्या म्हणाले, कोव्हिड घोटाळ्याला ठाकरे जबाबदार, आदित्य म्हणतात, सगळीकडचा गाळ काढण्याचं काम करतोय

Nashik Murder| 50 लाखांची मागणी बेतली डॉ. सुवर्णा वाजेंच्या जीवावर, चिठ्ठीतून काय झाला उलगडा?