लंडन : डझनावारी महिलांना आपल्या जाळ्यात ओढून एका पोलीसानेच त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. हा पोलीस अधिकारी डेटींग वेबसाईटचा वापर करीत महिलांचा विश्वास आत्मसात करायचा. त्यांच्याशी प्रेमाचे नाटक करीत त्यांना गुलामासारखी वागणूक द्यायचा. त्याने आतापर्यंत 12 महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले आहे. तसेच त्याच्यावर बलात्काराच्या 48 केसेस सहित एकूण 71 लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीसाने नागरीकांचे रक्षण आणि सुरक्षा करण्याची गरज असताना एका पोलीस अधिकाऱ्याने गेल्या वीस वर्षांपासून पोलीस खात्यात राहून अनेक महिलावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. हा पोलीस अधिकारी आपल्या पेशाचा गैरवापर करीत महिलांना डेटींग साईट्सद्वारे मैत्री करीत त्यांच्यावर बलात्कार करायचा अशी माहिती उघडकीस आली आहे. त्याने आतापर्यंत 48 बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. आतापर्यंत 12 महिलांना त्याने आपल्या वासनेने शिकार केले आहे, असा नराधम पोलीस आपल्या खात्यात आहे, हे जगात ज्यांच्या नावलौकीक आहे त्या लंडन पोलीसांनाच माहिती नव्हते. अखेर त्याच्या गुन्ह्यांचा छडा लागून त्याला अटक करण्यात यश आले आहे.
48 वर्षीय डेविड कॅरीक याने आतापर्यंत एक डझन महिलांवर अत्याचार केले आहेत. पोलीस सेवेत राहून त्याने महिलांना शिकार केले आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानूसार त्याने एका पाठोपाठ एक असे गुन्हे केले आणि पोलीस खात्याला त्याची कल्पनाच नव्हती. डेविड महिलांशी प्रेमाचे नाटक करीत फशी पाडायचा त्यांच्यावर बलात्कार करायचा, त्यांना बेल्टने मारायचा, नग्न करून घराची सफाई करायला सांगायचा असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याने अत्याचाराच्या सर्व परीसीमा गाठल्या होत्या. आपण पोलीस असल्याने आपल्याला काही होणार नाही अशा गुर्मीत तो महीलांना धमकवायचा. डेवीड पूर्वी सैन्यात होता, नंतर तो पोलीस खात्यात भर्ती झाला.
लंडनच्या संसदेत देखील त्याने ड्यूटी बजावलेली आहे. डेवीडने 12 त्याने पीडीत महिलांना घराच्या कपाटात कोंडून उपाशी ठेवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. या महिलांना निराश्रीत करीत त्यांच्या मजबूरीचा फायदा उचलायचा. घरगूती हिंसा आणि रेपच्या आरोपाखाली त्याच्यावर केसेस दाखल झाल्या, पण कारवाई झाली नाही. यावेळी मात्र त्याला अटक झाली असून त्याच्यावर आता खटला चालणार आहे.