पँटच्या खिशात सापडली ‘ती’ रिसीट आणि… कसा झाला खुनाचा उलगडा ?

| Updated on: Jan 04, 2025 | 3:05 PM

ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील एका महिलेच्या हत्येचा उलगडा रिसीटच्या मदतीने झाला. त्यामुळे 1600 किलोमीटरवर असलेल्या खुन्याच्या मुसक्या पोलिसांन वळल्या. आरोपीला अटक करण्यात आली असून हत्येचं कारण म्हणजे..

पँटच्या खिशात सापडली ती रिसीट आणि... कसा झाला खुनाचा उलगडा ?
हत्येचा उलगडा रिसीटच्या मदतीने झाला.
Follow us on

डिसेंबर महिन्यात ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील काठजोडी नदीच्या काठावर महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी कसून तपास करूनही मृतदेहाची ओळख पटू शकली नाही,एखादी व्यक्ती हरवल्याची तक्रारही कोणी नोंदवली नव्हती. अशा परिस्थितीत तो मृतदेह कोणाचा किंवा तो खून कोणी केला हे शोधणं खूपच कठीण होतं, पण एका पँटने खुन्याचा तपास लावण्यास मदत झाली. हो हो खरं त्या मृतदेहापाशी रक्ताने बरबटलेली राखाडी रंगाची पँट सापडली आणि त्याच्या खिशात असलेल्या एका रिसीटने खुनाचा उलगडा झाला.

ओडिशा पोलिसांना मृतदेहाजवळ रक्ताने माखलेली डार्क ग्रे रंगाची पँट सापडली. पोलिसांनी या पॅन्टची तपासणी केली असता त्याच्या खिशात एका टेलरच्या दुकानातील रिसीट अर्थात एक पावती त्यांना सापडली.विशेष म्हणजे या रिसीटवर एका पुरुषाच्या शरीराचे मापही लिहिलेले होते. आणि त्या पावतीवर ‘न्यू स्टार टेलर्स’ असे नाव लिहिले होते, तसेच त्यावर 3833 क्रमांकही होता.

सोशल मीडियावरून घेतला शोध

त्या टेलरसा शोधण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर केला तसेच आजूबाजूच्या गावांतही चौकशी सुरू केली होती. लवकरच एका व्यक्तीकडून त्यांना अशी माहिती मिळाली की ‘न्यू स्टार टेलर्स’ नावाचं हे दुकान ओदिशातलं नव्हे तर गुजरातच्या सूरतमधलं आहे. त्या एका क्लूमुळे ओदिशा पोलीस थेट 1600 किमी दूर असलेल्या एका टेलरकडे पोहोचले.

सुरतमध्ये सापडला सुगावा

मात्र तिथेही जाऊन त्याचं कामं सोपं नव्हतं कारण सुरते मध्ये एकच ‘न्यू स्टार टेलर्स’चं दुकान नव्हतं, तर त्या नावाची तब्बल 4 दुकानं होती. मात्र पोलिसांनी हार न मानता त्यातूनच शोध घेत एक , मूळ दुकान शोधून काढलं. भंजनगर भागत असलेल्या या टेलरच्या दुकानातून पोलिसांना सुगावा सापडला , ज्याच्या रिसीटवर ‘बाबू’ असा उल्लेख होता. त्यानंतर पोलिसांनी जराही वेळ न घालवात मोबाईल नंबर तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मतदीने त्याचा फोटो शोधला आणि ओदिशाला पाठवला.

पोलिस तपासात सुरतमधील यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या जगन्नाथ दुहरी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जगन्नाथ दुहरीला ओडिशातील रायगडा रेल्वे स्थानकावरून बेड्या ठोकण्यात आल्या. धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्येत त्याच्यासोबत त्याचा भाऊ बलराम आणि चुलत भाऊ हापी दुहरी यांचाही सहभाग होता.

अनैतिक संबंधांवरून हत्या ?

बलरामला असा संशय होता की त्याची पत्नी पद्मावती हिचे अनैतिक संबंध आहेत, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. त्यामुळे बलराम आणि इतर दोघांनी मिळून पद्मावतीची हत्या केली. या प्रकरणी जगन्नाथ आणि त्याच्या दोन साथीदारांना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.